बहुजननामा ऑनलाईन –
मेष
आजचा दिवस महत्वकांक्षांची पूर्तता करणारा आहे. व्यापारासाठी प्रवास कराल, जो भविष्यासाठी लाभ देईल. एखाद्या उच्च अधिकार्याशी वाद झाल्यास तो कायदेशीर होऊ शकतो, यासाठी वाणीवर संयम ठेवा. सायंकाळी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. दाम्पत्य जीवन सुखमय राहील. जोडीदार प्रत्येक निर्णयात तुमच्या सोबत राहील. सर्व योजनांची पूर्तता कराल, ज्यामुळे कुटुंबातील लोक आनंदी होतील.
वृषभ
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. कार्यक्षेत्रात शत्रुवर विजय मिळवाल. समाजिक क्षेत्र वाढेल, मित्रांची संख्या वाढेल. घरासाठी काही वस्तू खरेदी कराल. व्यापारात भावाचा सल्ला घ्या. सायंकाळी घरात वाद होऊ शकतो, वाणीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा नाते बिघडू शकते.
मिथुन
आजचा दिवस व्यापारासाठी प्रगतीचा आहे, दिवसभर आनंदी रहाल. राजकारणात काही अडथळे येऊ शकतात. रात्री कुटुंबासह मंगलकार्यात सहभागी व्हाल. संततीकडून शुभवार्ता समजू शकते. विवाहासाठी नवीन प्रस्ताव येतील. जोडीदारासोबतचा वाद संपेल. सायंकाळी घरी पाहुण्याचे आगमन होऊ शकते.
कर्क
आजचा दिवस प्रगतीचा आहे. भागीदारीच्या व्यापारात लाभ होईल. जोडीदाराचा सल्ला व्यापारासाठी उपयोगी ठरेल. रखडलेली कामे आज मार्गी लागतील. परंतु आळस दूर करा. सायंकाळी अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. सावध रहा. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल.
सिंह
आजचा दिवस आनंददायक आहे. चारही बाजूच्या वातावरणाचा आनंद घ्याल. स्वतासाठी काही पैसे खर्च कराल. आईच्या आरोग्यात घसरण होऊ शकते, बाहेरचे खाणे-पिणे टाळा. भाऊ किंवा बहिणीच्या विवाहातील अडथळे दूर होतील. सायंकाळी मित्रांसोबत मजामस्ती कराल.
कन्या
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. संपत्ती खरेदी करण्यात यश मिळेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल, मन आनंदी होईल. संततीला कोर्ससाठी प्रवेश देण्यासाठी उत्तम दिवस. धावपळ होईल. सरकारी नोकरी उच्च अधिकार्यांची कृपा राहील, प्रमोशन मिळू शकते, सॅलरी वाढू शकते.
तुळ
आजचा दिवस संमिश्र आहे. जोडीदाराचे सहकार्य, सहवास भरपूर मिळेल. संसारिक सुखाची साधने वाढतील. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. सायंकाळी प्रवास करू शकता, मात्र सावध रहा, आवडती वस्तू चोरीस जाऊ शकते. व्यापारात नवीन कल्पना अवलंबू शकता, ज्यामुळे व्यापाराला गती येईल. मित्राची मदत घ्याल.
वृश्चिक
आजचा दिवस संमिश्र आहे. दान करण्यासाठी खर्च कराल. आत्मसमाधान मिळेल. सायंकाळी मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. ऑफिसमध्ये अधिकार वाढतील, मात्र सहकार्यांचा मूड बिघडेल, शत्रू वाढतील. भागीदारीत व्यापार करायचा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे.
धनु
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. आजूबाजूचे वातावरण विपरीत असू शकते. मात्र, धैर्य आणि गोड वागण्याने वातावरण हलके बनवाल. प्रिय व्यक्तीच्या मदतीमुळे काही समस्या येऊ शकतात. नोकरीत शत्रू त्रास देतील, परंतु काहीही करूशकणार नाही. पण वाणी आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा, तरच यश मिळेल.
मकर
आजचा दिवस संमिश्र आहे. व्यापारात नवीन डील फायनल झाल्याने अचानक लाभ होईल. घरातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडू शकते, ताण येऊ शकतो. व्यापारात जोखीम विचारपूर्व घ्या, भविष्यात नुकसान होऊ शकते. मैत्रिच्या संबंधात गुंतवणूक टाळा, अन्यथा त्रास होऊ शकतो. महत्वाकांक्षांची पूर्तता झाल्याने आनंदी व्हाल.
कुंभ
आजचा दिवस प्रगतीचा आहे. मोठ्या प्रमाणात हातात पैसा येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. खर्च आणि उत्पन्नात संतुलन ठेवा. तरच हा पैसा टिकेल. व्यापाराला वेग देण्यासाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आई-वडीलांचा आशीर्वाद मिळेल. घरातील मुले एखादी मागणी करतील.
मीन
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. संततीकडून समाधान आणि एखादी शुभवार्ता समजू शकते. रोजगाराच्या नव्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. सायंकाळ मित्रांसोबत घालवाल. सासरच्या बाजूकडील कोणत्याही व्यक्तीला विचारपूर्वक पैसे उधार द्या, संबंधी बिघडू शकतात. दाम्पत्य जीवन आनंद दायक राहील.