नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या संसर्गाशी लढण्यासाठी सरकारकडून एकीकडे नागरिकांना देशभरात व्हॅक्सीन दिली जात आहे तर दुसरीकडे एक आयुर्वेदिक औषध सुद्धा समोर आले आहे जे कोरोनाच्या उपचारात परिणामकारक ठरत आहे. आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, हलक्या आणि मध्यम स्तराच्या कोरोनाच्या उपचारात AYUSH 64 नावाचे औषध परिणामकारक ठरत आहे.
आयुष मंत्रालयाने गुरुवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, देशात कोरोना संसर्गाच्या सध्याच्या स्थितीत प्रसिद्ध संस्थांच्या शास्त्रज्ञांचे हे संशोधन आशेचा किरण घेऊन आले आहे.
आयुषचे नॅशनल रिसर्च प्रोफेसर डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले की, आयुष 64 चे परिणाम खुपच उत्साहवर्धक आहेत आणि जगातील प्रतिष्ठित मेडिकल जर्नल्समध्ये याच्या क्लिनिकल ट्रायलचे परिणाम लवकरच प्रकाशित केले जातील. आयुष 64 एक हर्बल औषध आहे आणि याचा शोध केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने लावला आहे. हे हलक्या आणि मध्यम स्तराच्या कोरोना संसर्गाच्या उपचारात परिणामकारक आहे.
स्वताच हॉस्पिटलकडे धावू नका – डॉ. हर्षवर्धन
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी म्हटले की, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये काही दिवसात 400 पेक्षा जास्त बेड सुरू होतील. हे ऑक्सीजन सपोर्टेड असतील आणि बहुतांशवर व्हेंटिलेटर सुविधा असेल. मी स्वता पाहणी केली आहे. मला आश्वासन मिळाले आहे की आठवड्याच्या आत हे बेड सुरू होतील. ऑक्सीजन योग्य प्रमाणात अगोदर सुद्धा होता आणि आता तो आणखी वाढवण्यात आला आहे. लोकांना ऑक्सजीनबाबत योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्यास आवश्यकता आहे त्यास ऑक्सीजन मिळाला पाहिजे. स्वताहून हॉस्पिटलकडे धावू नका. डॉक्टरांनी सांगितले तर आवश्य जा.