बहुजननामा ऑनलाईन –
मेष : खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या. घाईत कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका. कामासाठी दिनमान चांगले आहे. मेहनतीवर विश्वास ठेवा. घरात शांतता असेल. नाती व्यवस्थित हाताळण्याचा प्रयत्न करा.
वृषभ : आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित कराल. कामाबरोबरच कुटुंबाकडेही लक्ष द्याल. ज्येष्ठांसोबत बसून वेळ घालवाल. दिवस मजबूत आहे. आरोग्य चांगले राहील. प्रेमसंबंधात सुखद परिणाम जाणवतील. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो.
मिथुन : भाग्यावर अवलंबून राहण्याची सवय सोडून द्या. आता आत्मविश्वास वाढवा आणि स्वतःच्या बळावर काम करा. आरोग्य चांगले राहील. मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. उत्पन्न वाढेल. नाती मजबूत होतील. वैवाहिक जीवनातून समाधान मिळेल.
कर्क : दुपारपर्यंत मानसिक ताण वाढेल. त्यानंतर मन आनंदी होईल. कामात चांगले परिणाम मिळतील. पकड मजबूत होईल. एखादी चांगली बातमी ऐकून आनंद होईल. आरोग्य चांगले राहील. नातेसंबंध जतन करुन खास लोकांची मने जिंकण्यात सक्षम व्हाल. आजचा दिवस उत्पन्नासाठीही चांगला आहे.
सिंह : दुपारपर्यंत स्थिती चांगली राहील. मनापासून आनंदी व्हाल. प्रत्येक कामात हातभार लावाल. दुपारनंतर एखाद्या गोष्टीबद्दल चिंता असू शकते. अनावश्यक पैसे खर्च कराल. ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात. उत्पन्न ठीक होईल. विरोधकांवर मात कराल.
कन्या : मानसिक ताणतणावातून दुपारपर्यंत बाहेर याल. त्यानंतर व्यवसाय चांगला चालेल. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. कामात बुद्धी वेगाने काम करेल आणि कठीण समस्या देखील सोडवाल. वैवाहिक जीवनात सहकार्याने प्रेम वाढेल.
तुळ : संततीची ओढ वाटेल. दुपारनंतर काही खर्च होतील. नोकरीवर लक्ष केंद्रित करा. ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. आरोग्य निरोगी राहील. भाग्य साथ देईल. उत्पन्न वाढेल. नात्यात प्रेम वाढेल. कौटुंबिक जीवन थोडे निराशजनक असू शकते.
वृश्चिक : आनंद होईल. कुटुंबाची साथ मिळेल. त्यांच्यासोबत मिळून काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. दुपरनंतर मुलांशी अत्यंत भावनिक पद्धतीने बोलाल आणि आपल्या मनातील त्यांना सांगाल. प्रेमसंबंधात आज रोमँटिक आणि सर्जनशील असाल. कामासाठी दिवस तुमचा आहे, त्याचा चांगला उपयोग करा.
धनु : आरोग्य मजबूत राहील. जेणेकरून कामे हातावेगळी करण्याचा प्रयत्न कराल आणि यश मिळेल. मन मजबूत राहील. बुद्धीचे सहकार्य मिळेल. कामात यश मिळेल. भाग्य प्रबळ राहील. उत्पन्न कमी होईल. अनावश्यक गुंतवणूकीमुळे पैशाचे नुकसान होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो, सावधगिरी बाळगा.
मकर : मानसिकदृष्ट्या आनंदी राहाल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. प्रेमसंबंधात स्वत:ला भाग्यवान समजाल आणि प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील सांगाल. कायदेशीर अडचणीत अडकू नका. कामासाठी दिनमान चांगले आहे.
कुंभ : उत्पन्न वाढेल, यामुळे आत्मविश्वासही वाढेल. नात्यात प्रेम वाढेल. जोडीदार हक्क मांडेल. कामासाठी दिनमान चांगले आहे. मेहनत केल्यास चांगले परिणाम मिळतील. खर्चाचे योग आहेत. विरोधकांपासून सावध रहा.
मीन : खर्चात वाढ झाल्याने तणाव वाढेल, परंतु मन आणि विचार दोन्ही आपल्या बाजूने राहतील. उत्पन्न ठीक होईल. नात्यात प्रेम वाढेल. जोडीदाराकडून मोठ्या गोष्टी ऐकायला मिळतील. व्यवसायासाठी दिवस भरभराटीचा आहे. आरोग्य चांगले राहील.