हिंगोली : बहुजननामा ऑनलाईन – Hingoli Crime News | हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सेलु या ठिकाणी आरोपी मुलाने एका शुल्लक कारणावरून आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केली आहे. आपले वडील आपल्यावर रागावल्याने त्याने वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली आहे. यानंतर हि हत्या लपविण्यासाठी अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली. मात्र, आज पहाटेच पोलिस घरी धडकले आणि सर्व घटना उघडकीस आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. (Hingoli Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे संपूर्ण प्रकरण?
वसमत तालुक्यातील सेलु येथील भाऊराव पांडुरग कबले (वय 42) हे कुटुंबियांसह राहतात. घरी पत्नी, तीन मुले असा परिवार असून, उदरनिर्वाहासाठी शेती नसल्याने कबले दांपत्य रोज मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यादरम्यान भाऊराव व त्यांच्या अल्पवयीन मुलामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यानंतर त्यांच्या आईने मध्यस्थी करून वाद सोडवला. त्यानंतर रात्री भाऊराव झोपण्याच्या तयारीत असताना त्यांनी मुलास रागावण्यास सुरुवात केली. यानंतर संतापलेल्या मुलाने हातात कुऱ्हाड घेऊन वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार केला. हा वार इतका जोरदार होता कि या हल्ल्यात भाऊराव यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे कबले कुटुंबियांना मोठा हादरा बसला. त्यांनी या प्रकरणाची कुठेच वाच्यता केली नाही,
तशीच संपूर्ण रात्र जागून काढली. यानंतर त्यांनी पहाटेच्या सुमारास भाऊराव यांच्या अंत्यसंस्काराची तयारी
सुरु केली. मात्र, या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे,
जमादार तुकाराम आम्ले, बालाजी जोगदंड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना अचानक आल्याचे पाहून संपूर्ण कुटुंबीय घाबरले.
पोलिसांनी या कुटुंबीयांची कसून चौकशी केली असता मुलानेच वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून खून
केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलास अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Hingoli Crime News | hingoli murder of father by minor son
हे देखील वाचा :