बहुजननामा ऑनलाईन – K. Viswanath | 2 फेब्रुवारी रोजी तेलगू चित्रपट सृष्टीतील महान दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे कासिनाथनि विश्वनाथ म्हणजेच के विश्वनाथ (K. Viswanath) यांचे निधन झाले होते. आता जवळपास एका महिन्यांनी त्यांच्या पत्नी जयलक्ष्मी यांनीही जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले आहे. (K. Viswanath)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गेल्या वर्षभरापासून के विश्वनाथ यांच्या पत्नी जयलक्ष्मी या आजारी होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या सोशल मीडियावर अभिनेता पवन कल्याण आणि चिरंजीवी हे जयलक्ष्मी यांना भेटायला गेल्याचा फोटो वायरल होताना दिसत आहे. जयलक्ष्मी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.
https://twitter.com/shreyasmedia/status/1629867333975158785
जयलक्ष्मी यांचे पती महान तेलुगु दिग्दर्शक के विश्वनाथ (K. Viswanath) हे वयोमानाशी संबंधित
आजारामुळे हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार घेत होते. यादरम्यानच 2 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले.
2017 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
ते तेलगू दिग्दर्शक असले तरी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही मोलाचे काम केले आहे.
तेलुगु दिग्दर्शक के विश्वनाथ यांच्या पत्नी जयलक्ष्मी या कर्नुल जिल्ह्यातील रहिवासी होत्या.
त्यांचे वडील हे स्टेशन मास्तर म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं एक मुलगी आणि सहा नातवंड असा परिवार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- K. Viswanath | k viswanath wife jayalakshmi passed away on february 26 at her hyderabad residence
हे देखील वाचा :
Akola Crime News | शेतात मोटार सुरू करताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू