हिंगणघाट : बहुजननामा ऑनलाईन – हिंगणघाट पिडिताचा गेल्या काही दिवसांपासून जीवनाशी सुरु असलेल्या संघर्ष आज अखेर थांबला. तिने आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. तिला गेल्या दोन दिवसांपासून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिचे ह्दय, यकृत, मुत्रपिंड असे सर्व अवयव निकामी झाल्याने तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला नांदुरी चौकात एकतर्फी प्रेमातून पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात ती ४० टक्के भाजली होती. मात्र, जाळण्याच्या घटनेत तिच्या घशात धुर गेल्याने तिची श्वासनलिका खराब झाली होती. गेली ८ दिवस तिचा संघर्ष सुरु होता. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करुनही ते अपुरे ठरले व तिचे आज निधन झाले. तिच्या निधनामुळे राज्यात सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.