पुणे : बहुजननामा ऑनलाईन – हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घातल्याच्या कृत्याचा सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील एसएफआय व इतर विद्यार्थी संघटनांनी निषेध केला आहे. बुधवारी सायंकाळी विद्यापीठातील रिफेक्टरीच्या समोर जमून प्रतिकात्मक गाणी म्हणत व घोषणा देत याचा निषेध केला.
महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घालून तो पेटविण्यात आला. त्याबरोबरच नथुराम गोडसे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या कृत्याचा स्टुडेंड फेडरेशन ऑफ इंडीया (एसएफआय) व इतर विद्यार्थ्यांनी रिफेक्टरीसमोर जमून मनुवादी मुर्दाबाद, महात्मा गांधी अमर रहे, अशा घोषणा देत प्रतिकात्मक गाण्यांच्या माध्यमातून याचा निषेध केला.
यावेळी एसफआयचे विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष सतीश ढेबडे, एनएसय़ुआयचा अध्यक्ष सतीश पवार, आकाश दौंडे , मयूर दामोदरे , वैभव गायकवाड , शकील , साबळे , सागर सोनकांबळे , वैभव, संविधान भालेराव , ओंकार गुंडाय्या , सागर नाईक , स्नेहल वरेकर , दीपाली पाटील ,सतीश फोले , प्रशांत कांबळे व इतर विद्यार्थी उपस्थित होते.
ओबीसी आरक्षणासंदर्भात भक्कमपणे बाजू मांडा, भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी