मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानची सर्वत्र नाच्चकी होत आहे तसेच इम्रान खान यांचा प्रत्येक प्रयत्न फेल होत आहे पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रीय मंत्री हिना रब्बानी यांनी इम्रान खान यांना घरचा आहेर दिला आहे. त्यांनी थेट इम्रान खान यांना अनाडी म्हणून संबोधले आहे. याबाबतचा रब्बानी यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे ज्यात रब्बानी हे इम्रान खान यांच्या कामावर ताशेरे ओढत आहेत. व्हिडीओमध्ये हिना रब्बानी इम्रान खान यांना संसदेत चांगलेच धारेवर धरताना दिसतात, त्यात त्या म्हणतात इम्रान खान देशाला राष्ट्रीय पातळीवर लाजवत आहेत.
तसेच तुम्ही अडाणी आहात तर ट्रेनिंग घेऊन या. हिना रब्बानी फक्त येवड्यावरच थांबल्या नाहीत तर त्या म्हणाल्या तुम्हाला देशाने बहुमत दिल आहे तर त्यांना शरमिंदा करू नका. तसेच त्यांनी इम्रान खान यांना प्रश्न विचारला की, तुम्हाला असे अजिबात वाटत नाही का, की लोकांनी तुमची इज्जत करावी ?
हिना रब्बानी यांचा अशा प्रकारचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इम्रान खान आणि त्यांच्या मंत्र्यांनी अनेक देशांमध्ये जाऊन मदत मागितली मात्र त्यांच्या एकाही प्रयत्नाला यश आले नाही. हिना रब्बानी यांनी इम्रान खानला आरसा दाखवला आहे. यामुळे आपल्याच देशात इम्रान यांना अपमान सहन करावा लागत आहे. हिना या पाकिस्तानच्या पीपल्स पार्टीच्या नेत्या आहेत तसेच माजी परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.
Where former Pak Foreign minister @HinaRKhar completely exposes Pak PM @ImranKhanPTI for making #Pakistan a global laughing stock with his knowledge of history & geography. (hope realisation finally dawns on those in India in awe of 'selected' Pak PM Imm D Dim) pic.twitter.com/mzCR3tDOGE
— GAURAV C SAWANT (@gauravcsawant) August 25, 2019