बहुजनामा ऑनलाइन : एके दिवशी पत्नीला पतीच्या बॉक्समधून अचानक लिपस्टिक हाती लागते. आपल्या पतीचे अन्य महिलेशी संबंध असल्याचा संशय पत्नीला येतो. पण सत्य काहीस धक्कादायकच होते. दरम्यान बायकोला लिपस्टिक सापडल्यानंतर तिने नवऱ्याला प्रश्न विचारले असता, तो सत्य लपवू शकला नाही. त्याने तिला सांगितले कि, त्याला स्वत: एक स्त्रीसारखे दिसायचे आहे. तो म्हणाले की, लैंगिक बदलांचीही शस्त्रक्रिया देखील करायची आहे.
ब्रिटनमधील कार्डिफ येथे राहणारी ३७ वर्षीय केली एलेन आणि ३८ वर्षीय वॉरेन हे गेल्या ११ वर्षांपासून विवाहबंधनात असून त्यांना २ मुले देखील आहेत. परंतु एरेनला वॉरेनच्या या सत्याबद्दल यापूर्वी कधीच माहिती नव्हते. त्याच वेळी, वॉरेनची इच्छा समजल्यानंतर, एलेन ने ठरवले की ती तिच्या नवऱ्याला लिंग बदलांसाठी शस्त्रक्रिया करण्यास मदत करावी. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते एकत्र राहणार असल्याचेही तिने ठरवले.
लिंग बदलल्यानंतर हे जोडपे समलिंगी जोडप्यांप्रमाणे पुन्हा लग्न करतील. केलीचा पती वॉरेनला स्वतःला एक स्त्री म्हणून वावरायला आवडते. त्यांची इच्छा आहे की लोकांनी त्यांना जोए या नावाने ओळखावे.