मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईतल्या घाटकोपर परिसरात चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 7 ला यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दलाल महिलेला अटक केले आहे. तर एका भोजपुरी अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची पोलिसांनी सुटका केली आहे. या कारवाईने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
कविता भोसले असे अटक केलेल्या दलाल महिलेचे नाव आहे. अटक केलेल्या महिलेच्या संपर्कात अनेक मॉडेल्स आणि कलाकार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
मुंबईतील घाटकोपर परिसरात एक सेक्स रॅकेट सक्रिय असून त्यात वेश्या व्यवसायासाठी मॉडल्स आणि अभिनेत्रींचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक बनून या सेक्स रॅकेटचे बिंग उघड केल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले. या रॅकेटच्या सूत्रधाराचा पत्ता लागलेला नाही, तो फरार असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बोगस ग्राहक बनून दलाल महिलेशी संपर्क साधला. बनावट ग्राहक बनलेल्या पोलिसांनी सिनेसृष्टीतील कलाकार किंवा मॉडेलची मागणी तिच्याकडे केली. आधी या महिलेने काहीच माहित नसल्याचा बनाव आखला. मात्र, पोलिसांनी तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तीने ग्राहक बनून आलेल्या पोलिसांकडे पैशांची बोलणी सुरु केली. एका रात्रीसाठी 55 हजार रुपयांची मागणी केली.
व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्या महिलेने ग्राहक बनलेल्या पोलिसाला तीन महिला दाखवले. त्यापैकी एकीची निवड करायची होती. यासाठी घाटकोपरमधील एक हॉटेलही बुक केले. तिथे ती त्या तीन महिलांसह आली. यात एक भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे, तर अन्य दोन मॉडेल्स आहेत. दरम्यान, हॉटेलच्या रुममध्ये ती महिला या अभिनेत्री आणि मुलींना दाखवत होती, त्याचवेळी गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारून तिघींची सुटका करत दलाल महिलेस अटक केली. अटक केलेली महिला या महिलांकडून 3 टक्के कमिशन घेत होती.