Heartburn | छातीत जळजळ किंवा Heartburn का होते, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय

Heart Attack | health preventive drug for heart attack scientist discover new gene to predict coronary disease

बहुजननामा ऑनलाइन टीम – Heartburn | छातीत जळजळ किंवा हार्टबर्न (Heartburn) चा त्रास झाला नसेल असा व्यक्ती क्वचित असेल. ही एक अत्यंत अस्वस्थ करणारी स्थिती आहे, ज्यामध्ये अचानक छातीत दुखते (chest pain) किंवा छाती चारही बाजूंनी बंद झाल्यासारखे वाटते. यास आपण हार्टबर्न म्हणतो. पण प्रत्यक्षात ते हार्टबर्न नसते याचा हार्टशी (Heart) काहीही संबंध नसतो.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याची काही लक्षणे हार्ट अटॅक (Heart Attack) किंवा स्ट्रोक (Stroke) शी मिळती-जुळती आहेत. जेव्हा घशातून पोटाकडे जाणार्‍या अन्ननलिकेमध्ये (Esophagus) इरिटेशन किंवा हालचाल होते तेव्हा छातीत जळजळ होते. या अवस्थेत छातीभोवती जळजळ होत असल्याचे जाणवते. हा आजार नाही. हे अ‍ॅसिड रिफ्लेक्स (Acid Reflex) मुळे होते. आतड्यात असलेला वायू जेव्हा घशाच्या विरुद्ध दिशेने येऊ लागतो तेव्हा छातीत जळजळ सुरू होते. (Heartburn)

 

हार्टबर्नची लक्षणे

छातीच्या मध्यभागी किंवा छाती हाडाभोवती (breastbone) अचानक जळजळ होणे.
घशात जळजळ जाणवते.
वाकताना, वळताना छातीत वेदना जाणवणे.
गरम, आम्लयुक्त, खारट आणि आंबट चव.
गिळण्यास त्रास.
मळमळ.

 

कोणत्या पदार्थांमुळे हार्टबर्न होते

जास्त प्रमाणात चरबी किंवा तेल असलेले पदार्थ, जास्त मसाला यामुळे छातीत जळजळ होऊ शकते. टोमॅटो, आंबट पदार्थ, कांदे, आले, कॉफी, अल्कोहोल, पेपरमिंट इत्यादी पदार्थ जास्त अ‍ॅसिड तयार करतात.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

हार्टबर्न दूर करण्यासाठी काय करावे

छातीत जळजळ झाल्यास अँटासिड टॅब्लेट दिली जाते. याशिवाय घरगुती उपायही करू शकता. टरबूज, केळी, सफरचंद, नाशपाती, ओटमील खाल्लयाने हार्टबर्नपासून आराम मिळतो. दही हा सुद्धा सोपा उपाय आहे.

 

हर्टबर्न टाळण्यासाठी काय करावे

लठ्ठपणावर नियंत्रण ठेवा, वजन वाढू देऊ नका.
कार्बोनेटेड पेये घेऊ नका.
कंबरेवर दबाव येणार नाही असे कपडे घाला.
जास्त खाऊ नका, कमी खा.
धुम्रपान करू नका.
बद्धकोष्ठता होऊ देऊ नका.
पुरेशी झोप घ्या.
खाल्ल्यानंतर लगेच झोपू नका, तीन तास थांबा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Heartburn | why do occur heartburn know the causes and symptoms

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | खरी शिवसेना कोण हे शिंदेंनी दाखवून दिले, फडणवीसांकडून दसरा मेळाव्याचे कौतुक, उद्धव ठाकरेंना डिवचताना म्हणाले – ‘सुज्ञ लोक शिमग्यावर…’

Kidney Health | ‘या’ 5 वस्तूंपासून रहा दूर, अन्यथा किडनीचे होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कसे

Health Benefits Of Peas | डोळ्यांच्या दृष्टी वाढवण्यापासून शुगरही कमी करते हिरवी मटार; जाणून घ्या 5 जबरदस्त फायदे