नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ सुरुच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत संक्रमांची एकूण 1 कोटी 23 लाख 3 हजार 131 प्रकरणे समोर आली आहेत.
दरम्यान यातील 1 कोटी 15 लाख 25 हजार 39 लाेक कोरोनातून बरे झाले आहेत. तर सध्या 6 लाख 14 हजार 696 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर या विषाणूने 1 लाख 63 हजार 396 लोकांचा जीव घेतला आहे.
कोरोना विषाणूच्या दुसर्या लहरीत देखील महाराष्ट्राला सर्वाधित फटका बसला आहे. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार देशातील 8 राज्यांत कोरोना संसर्गाची गती खूप वेगवान आहे. या राज्यांमध्ये एकूण प्रकरणांपैकी 84.61 टक्के प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्रा व्यतिरिक्त छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेश यांचा समावेश आहे.
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची लक्षणे –
– त्वचेवर पुरळ उठणे
– ताप
– खोकला
– स्नायू वेदना
– थकवा
– डोकेदुखी
– अतिसार
नवीन स्ट्रेनची लक्षणे जुन्या लक्षणांसारखी देखील आहेत. ज्यामध्ये वास कमी होणे, चव गमावणे, घसा खवखवणे समाविष्ट आहे.
संरक्षणाच्या पद्धती –
– संसर्ग रोखण्यासाठी, त्याच जुन्या गोष्टी पाळल्या पाहिजेत.
– बाहेर पडताना नेहमीच मास्क घालावा.
– हात धूवा किंवा सॅनिटाइज करत रहा. कारण हा विषाणू लहान थेंबांद्वारे पसरतो.
– एखाद्याला भेटताना अंतर ठेवा.
– गर्दीत जाण्याचे टाळा.
– गर्भवती महिलांनी कोरोना असलेल्या व्यक्तीशी संपर्क टाळावा.
– सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा आणि तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे टाळा.
– लोकांना भेटण्याऐवजी फोनवर संभाषण करणे चांगले.
– घरात लहान मुले असतील तर त्यांनाही मास्कसह पाठवा. बाहेरून आल्यानंतर, खाण्यापूर्वी हात कसे धुवायचे आणि कोविडपासून दूर कसे रहायचे याचे महत्त्व सांगा.
– तुमचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असल्यास लस घेणे उत्तम.