मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून कोरोनाशी लढा देताना सातत्याने अग्रभागी रहात असलेले आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनाही अखेर कोरोनाने गाठले. राजेश टोपे यांनी टिवट करुन आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले आहे.
या टिवटमध्ये राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 18, 2021
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर संपूर्ण राज्यात दौरे करुन राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी आतापर्यंत अत्यंत समर्थपणे सांभाळली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असताना गेली १० ते ११ महिने ते सातत्याने हॉस्पिटल, कोविड सेंटर यांना भेटी देऊन मार्गदर्शन करत आले आहेत.