बहुजननामा ऑनलाइन – तुमचा जर आरोग्य विमा(health insurance )असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. आरोग्य विम्यामुळे(health insurance )तुम्हाला जास्त सुविधा मिळतील. १ ऑक्टोबरपासून आरोग्य विमाचे नियम पूर्णतः बदलण्यात आले आहेत. एकदा पॉलिसी विकल्यानंतर ग्राहकाने क्लेम केल्यानंतर कंपनीला आता मनमानी पद्धतीने क्लेम रद्द करता येणार नाही. तसेच विम्यासाठी लागणारा वेळसुद्धा कमी होणार आहे.
जर तुम्ही लगातार ८ वर्षे पॉलिसी प्रिमीयम भरला असेल तर कोणत्याही कंपनीला कसलंही कारण देऊन क्लेम रद्द करता येणार नाही. तसेच पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त आजारांचा समावेश करता येणार नाही. मात्र याचा परिणाम प्रिमीयमच्या दरात दिसेल. यामुळे प्रिमीयमचे दरसुद्धा वाढू शकतात. या पॉलिसींमध्ये १ ऑक्टोबरपासून काही महत्वाचे बदल केले आहेत. यामध्ये हेल्थ इंश्युरन्स पॉलिसीचे नियम स्टॅंडराइज आणि ग्राहक केंद्रीत होणार आहेत तसेच आणखी काही बदलदेखील आहेत.
आता १ ऑक्टोबरपासून सर्व नवीन नुकसान भरपाई-आधारित आरोग्य विमा पॉलिसीमध्ये प्रमाणित कलमे असतील. ते १ एप्रिल २०२१ पासून अमलात येतील. विमा नियामकाच्या परिपत्रकात सर्वसाधारण अटी पॉलिसी कॉन्ट्रॅक्टचे कलम सुलभ करणे आणि संपूर्ण उद्योगात एकसारखेपणा सुनिश्चित करणे हे आहेत. प्रीमियम वार्षिक, तिमाही किंवा मासिक अशा हप्त्यांमध्ये भरता येतो. मागील वर्षात विमाधारक व्यक्तीने विमा पॉलिसी दावा केला होता त्या कारणास्तव पॉलिसीचे नूतनीकरण नाकारता येणार नाही. विमा उतरवणाऱ्याकडून पॉलिसीधारकास नूतनीकरणाची माहिती देण्यात येईल आणि पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी प्रीमियम भरावा लागेल.