नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसपासून वाचायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीला आपली इम्यून सिस्टम मजबूत करावी लागेल. घर आणि ऑफिसला कोरोना फ्री करण्यासाठी जरूरी आहे की, आजूबाजूला स्वच्छता ठेवली जावी. व्हायरसबाबत बोलले जाते की, तो कार्डबोर्डवर जवळपास 24 तासासाठी राहू शकतो, आणि तिन दिवसांपर्यंत प्लास्टिकच्या पृष्ठभागावर राहू शकतो.
अनेक अभ्यासांमधून ही गोष्ट समोर आली आहे की, व्हायरस काच, धातु, प्लास्टिकवर नऊ दिवसांपर्यंत राहू शकतो. या व्हायरसच्या संसर्गापासून वाचायचे असेल तर आपल्या आजूबाजूच्या वस्तू किटाणूरहीत कराव्याच लागतील. घरातील फर्नीचर किंवा जरूरी समानाला किटाणूरहीत करण्यासाठी आपल्याला बाहेरून सॅनिटायजर खरेदी करण्याची गरज नाही. उलट तुम्ही घरात उपलब्ध सामान वापरून वस्तू किटाणूरहीत करू शकता. कशाप्रकारे तुम्ही आपले घर आणि स्वताला कोरोना-फ्री ठेवू शकता, ते जाणून घेवूयात.
या आहेत पद्धती
1. ब्लीच :
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, व्हायरसला मारण्यासाठी ब्लीचचे पाणी चांगले ऑपशन आहे. एक गॅलन पाण्यासोबत अर्धाकप ब्लीच मिसळा. हे वापरण्यापूर्वी हातात ग्लव्हज घाला. ब्लीचला अमोनिया किंवा अन्य रसायनासोबत मिसळू देऊ नका. ब्लीच आणि पाण्याचे मिश्रण एक दिवसापेक्षा जास्त ठेवू नका, कारण ब्लीचची शक्ती नष्ट होते. शिवाय, ज्या कंटेनरमध्ये तुम्ही ते ठेवता तो सुद्धा खराब होऊ शकतो.
2. आयसोप्रोपिल अल्कोहोल :
कार्डबोर्ड, प्लास्टिक किंवा कठिण पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी किमान 70 टक्के अल्कोहोलचे मिश्रण वापरा. प्रथम पाणी आणि डिर्जंटसह पृष्ठभाग स्वच्छ करा. यानंतर पृष्ठभागावर अल्कोहोलच्या मिश्रणात कोणताही पदार्थ न मिसळता त्याद्वारे पृष्ठभाग स्वच्छ करा. मिश्रण पृष्ठभागावर 30 मिनिटापर्यंत राहू द्या. यानंतर ते पुसून काढा. जवळपास सर्वच पृष्ठभागावर अल्कोहोलचा वापर करणे सुरक्षित आहे. मात्र, प्लास्टिक निर्मित पृष्ठभागावर याच्या वापराने रंग कमजोर पडू शकतो.
3. हायड्रोजन पेरॉक्साईड :
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, 3 टक्के हायड्रोजन पेरॉक्साईड रायनो व्हायरसला मारण्यासाठी प्रभावी आहे. कोरोनो व्हायरसच्या तुलनेत रायनो व्हायरसला मारणे अधिक कठिण आहे. हायड्रोजन पेरॉक्साईड कोरोना व्हायरसला सहज मारू शकते. तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड टाका आणि ते कठिण पृष्ठभागावर वापरा. मिश्रण एक मिनिटापर्यंत पृष्ठभागावर राहू द्या, नंतर कपड्याने पुसून घ्या. हायड्रोजन पेरॉक्साईड ब्लीचप्रमाणेच काम करते, यासाठी ते कपड्यावर सुद्धा वापरता येते.
4. साबण आणि पाणी :
आपण आतापर्यंत लाखोवेळा वाचले आणि ऐकले असेल की, साबण आणि पाण्याने हात धुणे आपली पहिली पसंती असली पाहिजे. व्हायरस नष्ट करण्यासाठी आपले हात किमान 20 सेकंदसाठी साबण आणि पाण्याने धुवा. हात धुण्यासाठी तुम्ही कोणत्याही साबणाचा वापर करू शकता.
घरात बनवलेल्या सॅनिटायजरचा वापर करू नये :
हा तुमच्या आरोग्याशी खेळ होऊ शकतो. तुम्ही घरात प्रोफेशनली सॅनिटायजर बनवू शकत नाही. यासाठी बाजारात तयार उत्पादनावर विश्वास ठेवा आणि ते वापरा.
व्होडकाचा वार करू नका :
व्हॉटसअपवर अशा प्रकारचे मॅसेज खुप फॉरवर्ड होत आहेत की, कोरोनाला मारण्यासाठी व्होडका दारूचा वापर करा. परंतु, अनेक व्होडका बनवणार्या कंपन्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या उत्पादनात कोरोना व्हायरसला मारण्यासाठी आवश्यक एथिल अल्कोहोल नाही.
चहाच्या झाडांचे तेल वापरू नका :
काही अभ्यासानुसार, चहाच्या झाडांचे तेल व्हायरसला मारू शकते, परंतु अजूनही याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नाही.