नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील संशोधक सध्या कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी लवकरात लवकर वॅक्सीन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक देखील या वॅक्सीनची अतुरतेने वाट पहात आहेत. वॅक्सीन 2020 संपण्यापूर्वी तयार करण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत 5 रिसर्च ग्रुप्स क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यात पोहचले आहेत.
सुरूवातीच्या ट्रायलमधून अनेक प्रकारच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी समोर आल्या आहेत. वॅक्सीन कशाप्रकारे काम करेल हे जाणून घेण्यासाठी जास्त डाटाची गरज भासणार आहे. परंतु, याच्याशिवाय एक्सपर्टने साइड-इफेक्ट्स बाबत सुद्धा इशारा दिला आहे.
वॅक्सीनकडून किती अपेक्षा ठेवावी?
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठाचे एक्सपर्ट, जे ट्रायलच्या डाटाची जवळून तपासणी करत आहेत, त्यांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत जेवढ्या वॅक्सीन आल्या आहेत, त्या व्हायरसला निष्प्रभ करण्यात आणि इम्यून वाढवण्यात परिणामकारक ठरल्या आहेत. मात्र, त्यांचे साइड इफेक्ट्स सुद्धा होऊ शकतात.
वॅक्सीनबाबत माहिती
शास्त्रीयदृष्ट्या, वॅक्सीन प्रतिक्रियाजनक असते, म्हणजे ज्या सहभागी लोकांना वॅक्सीन दिली जाईल, त्यांच्यात हलकी लक्षणे किंवा काही काळासाठी अस्वस्थेचा अनुभव येऊ शकतो. आता ज्या व्यक्तींना ट्रायलमध्ये वॅक्सीन देण्यात आली आहे, त्यांच्यामध्ये हलक्या वेदना, चक्कर येणे, ताप, थकवा, मांसपेशी दुखणे, हात सूजणे आणि थंडी वाजणे अशी लक्षणे दिसली.
असे का होत आहे?
कोणतीही वॅक्सीन जेव्हा दिली जाते, तेव्हा तिचा उद्देश एखाद्या व्हायरसच्या संसर्गाविरूद्ध संरक्षक ढाल बनणे असते. वॅक्सीन संसर्ग दूर करण्याची चांगली शक्यता असते, परंतु आपल्या शरीरासाठी ती नवीन असते, यामुळे प्रतिकारशक्ती तात्काळ प्रतिक्रिया देते, ज्यामुळे ही लक्षणे दिसतात.
बहुतांश वॅक्सीनचे हलके साइड-इफेक्ट असतात, तर काही वॅक्सीनमुळे अन्यच्या तुलनेत जास्त वेदना देतात आणि साइड-इफेक्ट सुद्धा गंभीर असतात. यामुळेच वॅक्सीन बाजारात आणण्यापूर्वी अनेक टप्प्यात तिची ट्रायल घेण्यात येते, यामध्ये जास्त वेळ जातो.
कोरोना वॅक्सीनचे साइड इफेक्ट गंभीर आहेत का?
वॅक्सीन काय काम करेल आणि कोणते करणार नाही, हे जाणून घेण्यासाठी संशोधक मोठ्या कालवधीपासून वॅक्सीनच्या डोसवर प्रयोग करत आहेत. ऑक्सफर्डच्या वॅक्सीनमध्ये व्हायरसचा निष्प्रभ करण्यासाठी आणखी एक डोस दिल्यास परिणामकार दिसून आली आहे. तर, मॉडर्नाच्या ट्रायलमध्ये एका सहभागीला दुसरा डोस दिल्यानंतर 103 डिग्री ताप आला, ज्यावर उपचार करावा लागला. तर कॅनसीनोच्या ट्रायलमध्ये सुमारे तीन-चतुर्थांश लोकांना वॅक्सीनचे साइड-इफेक्ट्स जाणवले.