नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Hasin Jahan | स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात साजरा केला जात असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची (Mohammed Shami) पत्नी हसीन जहाँने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांना देशाचे नाव बदलण्याचे आवाहन केले आहे. हसीनने ‘इंडिया’ या नावावर आक्षेप घेतला आहे. (Hasin Jahan)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हसीन जहाँने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तीन मुली पांढरा पोषाख घालून नृत्य करताना दिसत आहेत. त्यांनी तिरंगी रंगाची ओढणी घेतली असून त्या ‘देश रंगीला’ या गाण्यावर नृत्य करत आहेत.
जहाँने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आपला देश, आपला अभिमान. माझं भारतावर प्रेम आहे. आपल्या देशाचे नाव भारत किंवा हिंदुस्थान असावे. मी माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री यांना देशाचे नाव बदलण्याची विनंती करते. जेणेकरून जगभरात आपल्या देशाला ‘भारत किंवा हिंदुस्थान’ म्हटले जाईल इंडिया नाही. या मागणीमुळे हसीन जहाँ पुन्हा चर्चेत आली आहे.
हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी यांचा 2014 मध्ये विवाह झाला होता.
यानंतर, 2018 मध्ये हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसह अनेक गंभीर आरोप केले.
मात्र, बीसीसीआयने तपासात शमीला निर्दोष ठरवले असून तो देशासाठी खेळत आहे.
हसीन जहाँने शमीवर अनेक गंभीर आरोप केल्यापासून ती सतत काहीना काही कारणाने चर्चेत असते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Hasin Jahan | cricketer mohammed shami wife hasin jahan appealed pm narendra modi to change name of india
हे देखील वाचा :
Amruta Fadnavis | ‘मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान असायला हवं’ – अमृता फडणवीस