बहुजननामा ऑनलाइन टीम – येत्या आठवड्यात विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड मध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हवामानाच्या वेगवेगळ्या तर्हा अनुभवायला येत आहे. अचानक डिसेंबरमध्ये थंडी ऐवजी पावसाचा अनुभव घ्यावा लागला. जानेवारीमध्ये उबदार वातावरण असतानाच फेब्रुवारीत अचानक थंडीचा कडाका वाढला.
Extended Range Forecast by IMD
विदर्भात १५ -१७ फेब्रुवरी दरम्यान हलक्या पावसाची 🌩🌩 शक्यता … pic.twitter.com/vcWScQiIwa— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 11, 2021
आता हवामान विभागाने १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान गडगडाटासह वादळी पाऊस व त्याच्या जोडीला गारपीट होण्याचा इशारा दिला आहे. विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील काही ठिकाणी तीन दिवस गारपीट, पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.