जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. माझ्यावर विरोधकांकडून सतत कुरघोड्या केल्या जातात. मी शांतपणे काम करणारा माणूस आहे. मी माझे पालकमंत्रीपद आणि सरकार अजून कोणाला दाखविले नाही. जर मी दाखवले, तर बरीच लफडी माझ्याकडे आहेत, असा इशारा गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विरोधकांनी माझ्यावरील कुरघोड्या कमी केल्या नाही, तर मी त्यांची देखील लफडी बाहेर काढू शकतो, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले आहेत. त्यांनी यावेळी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर देखील भाष्य केले. शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील टीकेवर बोलताना म्हंटले होते की, राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) फूट पडू शकते. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, मी महाविकास आघाडीत फूट पडण्याचीच वाट बघतोय.
धरणगाव शहरातील बसस्थानकात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बस आल्या नसल्याने विद्यार्थीनी अडकून पडल्या होत्या. त्यांनी नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यावर गुलाबराव पाटील बोलत होते.
गुलाबराव पाटलांनी या प्रकाराला उद्धव ठाकरेंना जबाबदार धरले आहे.
शेगावला कार्यक्रम असल्यामुळे सर्व बसेस व्यग्र आहेत. मुंबईला आमचा आणि उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम होता,
त्यावेळी देखील अशीच परिस्थिती झाली होती. तेव्हा आंदोलन झाले नाही.
आता काँग्रेस त्यांचा लाडका पक्ष झाला आहे. त्यांचे राजे येणार आहेत.
त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व बस सोडल्या आहेत, असे यावेळी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले.
तसेच महाविकास आघाडीत फूट पडणार असेल, तर चांगलेच आहे. मी त्याची वाट बघत आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil gets angry and slams opposition in jalgaon
हे देखील वाचा :