नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Gujarat Election 2022 | राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात अधिकार्यांना निवडणुकीदरम्यान स्वत:चे शहर अथवा घर असेलल्या जिल्ह्यांत नियुक्त करण्यात येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) गुजरातच्या मुख्य सचिवांना आदेश दिले होते. त्या आदेशाचे पालन करत मुख्य सचिवांनी 900 अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. (Gujarat Election 2022)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील अधिकार्यांच्या बदल्यांबाबत मुख्य सचिवांनी एक आदेश काढला आहे. त्यानुसार, विविध श्रेणी आणि सेवांमधील तब्बल 900 अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत.
शिवाय, 6 वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांसह (IPS officer) 51 अधिकार्यांच्या बदल्या अद्यापही बाकी आहेत. त्यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रेमवीर सिंग Additional Commissioner of Police Premveer Singh (गुन्हे, अहमदाबाद शहर), एजी चौहान (वाहतूक, अहमदाबाद शहर), पोलीस उपायुक्त हर्षद पटेल Deputy Commissioner of Police Harshad Patel (नियंत्रण कक्ष, अहमदाबाद शहर), मुकेश पटेल (झोन-चार, अहमदाबाद शहर), भक्ती ठाकर (ट्रॅफिक, अहमदाबाद शहर), पल सोलंकी (गुन्हे, सुरत शहर) यांचा समावेश आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशबरोबरच गुजरात विधानसभा निवडणूक (Gujarat Election 2022) एकत्रित घेण्याची
घोषणा न करण्याच्या आयोगाच्या निर्णयावरून वाद उद्भवला होता.
या दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेण्याच्या आजपर्यंतच्या परंपरेला आयोगाने छेद दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Himachal Pradesh Assembly Elections) 12 नोव्हेंबरला
मतदान घेण्याची आणि 8 डिसेंबरला मतमोजणी करण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने 14 ऑक्टोबरला केली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Gujarat Election 2022 | election commission transfers over 900 officers in gujarat
हे देखील वाचा :
Narayan Rane | ‘पंचवीस पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावला’ – फेसबूक बहाद्दर