बहुजननामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन हे पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी या दोघांनी त्यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाची (Fighter Movie) घोषणा केली होती. तसेच त्यांनी शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर या (Fighter Movie) चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुहूर्त मिळाला असून हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला ‘फायटर’ (Fighter Movie) हा चित्रपट भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट (Aerial action movie) आहे. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण भारतीय वायुसेनेचे पराक्रमी पायलट साकारणार आहेत. तसेच अनिल कपूरही (Anil Kapoor) या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. भारताच्या सशस्त्र दलांना मानवंदना देणारा हा चित्रपट, प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण जगभर झाले असून, चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अत्याधुनिक तंत्रे आणि तंत्रज्ञानाचा सुरेख वापर करण्यात आला आहे.
भारतातील सर्वात मोठे अॅक्शनपट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) हे ‘फायटर’च्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत.
व्हायकॉम18 स्टुडिओ आणि मारफ्लिक्स पिक्चर्स यांची निर्मिती असलेला हा अॅक्शन पॅक चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीला उतरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Fighter Movie | deepika padukone hrithik roshan starrer fighter will be realising in january
हे देखील वाचा :
Akshay Kumar | अक्षक कुमारचा ‘रामसेतू’ बुडाला
Maharashtra Politics | डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेत शिंदे आणि ठाकरे दोघांचेही फोटो