मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – यावर्षी चित्रपट प्रेमींसाठी दिवाळी खास ठरली आहे. कारण, यंदाच्या दिवाळीत एकापेक्षा एक तीन मोठे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ (Akshay Kumar), अजय देवगणचा ‘थँक गॉड’ (Thank God) तर सुबोध भावे याचा ऐतिहासिक ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. ‘हर हर महादेव’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असताना हिंदीकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. रामसेतूने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली पण आता प्रेक्षक मिळेणासे झाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रामसेतूने पहिल्या दिवशी पंधरा कोटीपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. प्रदर्शनापूर्वी अक्षय कुमारचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल, याबाबत सर्वच साशंक होते. पहिल्या दिवसाच्या कमाईवरुन रामसेतू सुपरहिट ठरणार, असे बोलले जात होते पण आता मात्र चित्र पालटले आहे.
रामसेतुने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 15 कोटी,
दुसऱ्या दिवशी ११ कोटी रुपये तर तिसऱ्या दिवशी ८ कोटी २० लाख रुपये कमाई केली.
आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ३४ कोटी २० लाख रुपये कमाई केली आहे.
दिवाळीनिमित्त प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतील,
अशी चर्चा आणि आशा होती. पण प्रत्यक्षात मात्र चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नसल्याचे दिसत आहे.
प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.
बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज आणि रक्षाबंधन दणक्यात पडल्यावर रामसेतूकडून निर्माते आणि कलाकारांना मोठ्या अपेक्षा होत्या.
पण कमाईत अशीच घसरण सुरु राहिली, तर रामसेतू 100 कोटी तरी गाठणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Akshay Kumar | akshay kumar ram setu movie box office collection day 3 huge drop on 3rd day see details
हे देखील वाचा :
Maharashtra Politics | डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेत शिंदे आणि ठाकरे दोघांचेही फोटो
Pune Pimpri Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरून बायकोच्या मित्राचा भोसकून खून