नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारकडून अनेक योजना (Government Scheme) भारतीय सैनिकांसाठी राबवल्या जातात. ज्याचा लाभ माजी सैनिकांना (Ex-Servicemen) सुद्धा दिला जातो. यामध्ये आरोग्य सुविधांपासून दरमहिना पेन्शन (Pension) मिळवण्याच्या लाभाचा समावेश आहे. मात्र, अधिकारी रँकच्या खालील लोकांना पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी 15 वर्ष सेवा करण्याची आवश्यकता असते. (Government Scheme)
अधिकार्यांसाठी सेवा कालावधी किमान 20 वर्ष असावा. माजी सैनिकांना याशिवाय आणखी काही सुविधा दिल्या जातात. या अंतर्गत माजी सैनिकांच्या मुलींना विवाहासाठी 50,000 रुपयांची रक्कम दिली जाते. (Marriage Of Daughter Of Ex-Servicemen)
ही योजना पेन्शनधारक, बिगर पेन्शनधारक माजी सैनिकांना (ISM) नौदल, हवाई दलात हवालदार किंवा समकक्ष पदापर्यंत आर्थिक मदत प्रदान करते. ही योजना 1981 मध्ये 3,000 रुपये प्रति मुलगी, रक्कमेसह सुरू करण्यात आली होती.
यानंतर या योजनेंतर्गत मे 2007 मध्ये सुधारणा करून 16,000 रुपये प्रति व्यक्ती आणि दोन मुलींसाठी लागू केले होते. यानंतर 16 जुलै 2015 मध्ये ही शिफारस करण्यात आली आहे की, 1 एप्रिल 2016 पासून ईएसएम/विधवांकरता विवाह अनुदान 16,000 रुपये प्रति मुलगी वाढवून 50,000 रुपये करावे. परंतु या योजनेत कमाल दोन मुलींना मदत दिला जाते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उद्देश आणि मदत रक्कम
याचा उद्देश ईएसएम किंवा हवालदार पदापर्यंतच्या विधवा आणि एक्समॅनच्या मुलींचे लग्न आणि विधवांच्या पुनर्विवाहसाठी आर्थिक मदत देते. या अंतर्गत एएफएफडीएफ 50,000 रुपये प्रति मुलगी/विधवा, ज्यांचा विवाह 01 एप्रिल 2016 च्या नंतर झाला आहे च्या दराने केले जाते. (Government Scheme)
काय आहे अट
- अर्जदार ईएसएम किंवा त्यांची विधवा असावी.
- हवालदार आणि त्यापेक्षा खालील पदाचा असावा.
- मुलीचे वय 18 वर्षापेक्षा वर असावे.
कसा मिळेल लाभ
याचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. ईएसएम/विधवा/अवलंबित ऑनलाइन केंद्रीय सैनिक बोर्डाची वेबसाइट http://www.ksb.gov.in वर रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि नंतर विवाह अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज करा. योसाबत काही कागदपत्रे अपलोड करावे लागतात. जर एखादी दुसरी मुलगी असेल तर विवाह अनुदानासाठी विवाहाच्या तारखेच्या 180 दिवसांच्या आत नवीन ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे.
हे कागदपत्र करावे लागतील अपलोड
डिस्चार्ज बुक / कागदपत्र, मुलीच्या वयाचा दाखला, विवाहाचा पुरावा – रजिस्ट्रार / सरपंचाकडून प्रमाणपत्र, अर्जदाराकडून एक प्रमाणपत्र की त्याने मुलीच्या विवाहासाठी संबंधित राज्य सरकार / सेवांकडून काही पैसे / मदत / अनुदान घेतलेले नाही, त्याचे कागदपत्र, बँक खाते क्रमांक तपशील, अर्जदार ईएसएम / विधवा / अवलंबित यांचे आधार कार्ड इत्यादी.
Web Title : Government Scheme | this government scheme gives an amount of 50000 on the marriage of daughter of ex servicemen know how to get benefits
Kalicharan Maharaj | कालीचरण महाराज नेकमे आहेत तरी कोण? त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध?
Coronavirus in India | ‘कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट…’, महाराष्ट्रासह 8 राज्यांना केंद्राचा अलर्ट