नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोबाईल इंटरनेट कधी स्लो होईल हे काही सांगता येत नाही. अचानक नेट स्लो होण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. कधी कधी गुगल सर्च करणंही अवघड होतं. यासाठी तुमच्याकडे एक बॅकअप प्लॅन आहे. यासाठी तम्ही गुगल गो (Google Go) अॅप वापरू शकता.
गुगलने गुगल गो अॅप 2017 मध्ये लाँच केलं होतं. इंटरनेट स्लो असताना किंवा एंट्री लेवल स्मार्टफोनमध्ये गुगलची सर्व्हिस देता यावी हा याचा हेतू होता. याआधी अँड्रॉईड गो (Android Go) डिव्हाईसमध्ये गुगल गो युज केलं जाऊ शकत होतं आणि तेही निवडक देशांतच. आता मात्र गुगलने गुगल गो सर्वांसाठी लाँच केलं आहे.
Starting today, our lightweight search app #GoogleGo will be available globally on the @GooglePlay store. As demo'd at #io19, Lens in #GoogleGo can help translate and search the words you see around you, and even read them aloud.https://t.co/rAjR34KznM
— Sundar Pichai (@sundarpichai) August 20, 2019
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट केलं आहे की, “आजपासून आमचं लाईटवेट सर्च अॅप गुगल गो (Google Go) ग्लोबली उपलब्ध होणार आहे. हे गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड केलं जाऊ शकतं. गुगल गो मध्ये देण्यात आलेला लेंस नावाचा पर्याय तुमचे शब्द ट्रांसलेट आणि सर्च करण्याचे काम करेल आण ते तुम्हाला वाचूनही ऐकवेल. कारण यात रिड आऊट लाऊडचा पर्यायही असेल.”
हे अॅप 7 एमबी असून खूप कमी जागा घेतं. गुगल गो फास्ट असून यात सर्च केलेल्या क्वेरीला ते सर्च करतं आणि तुम्ही ऑनलाईन आल्यानंतर तुम्हाला रिजल्ट दाखवतं.