बहुजननामा ऑनलाइन टीम – सध्या एअरटेल, Vi (व्होडाफोन-आयडिया), बीएसएनएल आणि रिलायन्स जिओ यांसारख्या मोबाईल नेटवर्क कंपन्यांचे जाळे सर्वत्र पसरत आहे. तसेच जिओही (Jio) आपल्या ग्राहकांसाठी काहीतरी स्पेशल प्लॅन्स आणत असतो. त्यानंतर आता जिओ कंपनीने महिनाभर वैधता असलेला नवा प्लॅन आणला आहे.
रिलायन्स जिओने 28 दिवसांच्या प्लॅनची सुरुवात केली आहे. या प्लॅनच्या पॅकची किंमत 129 रुपयांपासून सुरु होते. 129 रुपयांचा कंपनीचा हा सर्वात स्वस्तातील प्लॅन आहे. या पॅकमध्ये ग्राहकाला एका महिन्यासाठी इंटरनेट डाटा आणि कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
जिओसारखीच Airtel, Vi चा सध्या 129 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. त्याविषयी माहिती आपण आता घेणार आहोत…
रिलायन्स जिओ (Reliance Jio) :
जिओचा हा प्लॅन सर्वात स्वस्तातील आहे. कंपनीच्या वेबसाईटवर हा प्लॅन Affordable Packs च्या कॅटेगरीमध्ये दिला जात आहे. या पॅकच्या माध्यमातून ग्राहकाला 28 दिवसांची वैधता, एकूण 2GB डाटा मिळू शकतो. तर दररोज 300 SMS मिळतात.
व्होडाफोन-आयडिया (Vi) :
व्होडाफोन-आयडिया या कंपनीकडून 129 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. पण या प्लॅनमध्ये Jio पेक्षाही कमी दिवसांची वैधता मिळते. यामध्ये 24 दिवसांसाठी 2 GB डाटा आणि 300 SMS मिळतात.
एअरटेल (Airtel) :
एअरटेल कंपनीकडूनही व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांसारखी सुविधा मिळते. हा पॅक 24 दिवसांच्या वैधतेसह 2 GB डाटा आणि 300 SMS उपलब्ध आहे. इतकेच नाही तर यामध्ये Amazon Prime चे 30 दिवसांचे फ्री ट्रायल, फ्री हॅलोट्यून्स, एअरटेल एक्सट्रिमचे सबस्क्रिप्शनही मिळत आहे.