बहुजननामा ऑनलाइन टीम – गुगलने Gmail युझर्सना आपली एक खास सेवा विनामूल्य देण्याची घोषणा केली आहे. या अत्यावश्यक सेवेसाठी गुगल युझर्सकडून जूनपर्यंत कोणतेही शुल्क आकारणार नाही. Gmail च्या वापरकर्त्यांपर्यंत व्हिडीओ कॉलिंग सेवा गुगल मीटवर जूनपर्यंत पूर्णपणे विनामूल्य दिली जाणार असल्याची माहिती Google ने ट्विटद्वारे दिले आहे. तसेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 24 तासही व्हिडीओ कॉल करू शकता.
गेल्या वर्षी Google ने आपल्या व्हिडीओ कॉलिंग सेवेचे नाव गुगल हँगआउट वरून Google Meet असे केले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने Gmail च्या सर्व वापरकर्त्यांसाठी व्हिडिओ कॉलिंग सेवा विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला होता. तर यापूर्वी गुगलने गुगल मीट सेवा ही मार्च 2021 पर्यंत विनामूल्य देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता ही सेवा जूनपर्यंत मोफत ठेवण्याची घोषणा केली आहे. आयओएस आणि अँड्रॉईड स्मार्टफोन वापरणा-यांना गुगल मीट विनामूल्य वापरता येईल. Google मीटद्वारे कॉलवर जास्तीत जास्त 49 जण जोडले जाऊ शकतात. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, Google ने व्हिडीओ कॉलिंग वैशिष्ट्यांसह Gmail अधिक आकर्षक बनविण्यासाठी Google मीट तयार तयार केले होते.