नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे इंटरनेटचा वापर जवळपास १० पटीने वाढला आहे. अनेक कंपनी, शाळा, कॉलेज बंद असल्याने घरूनच ऑनलाइन इंटर्नच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. आपली कामे लवकर आणि योग्य पद्धत्तीने उरकण्यासाठी अनेकजणांना इंटरनेटची आवश्यकता खूप आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्या अनेक सुविधा आणत आहे. समजा ग्राहकाकडे ब्रॉडबँड इंटरनेट नाही तर ती व्यक्ती टेलिकॉम कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅनचा वापर करू शकते, यात 4 GB data, Unlimited calling आहे. तसेच, दुसरं म्हणजे आताच्या नव्या प्लॅननुसार केवळ ८ रुपयात 4 GB data मिळणार आहे.
Vodafone-Idea प्लॅन –
४९९ रुपयांच्या Vodafone-Idea प्लॅनमध्ये वापरकर्त्याला डेली 4 GB dat दिला जातोय, यात वैधता ५६ दिवस आहे. डेली फक्त ८ रुपयात data चा लाभ घेऊ शकणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये Unlimited calling सह डेली 100 SMS मोफत मिळणार आहे. युजर्सला Bing all night आणि weekend data रोलओव्हर फायदा देखील होणार आहे. याचबरोबर Movies आणि TV अॅपचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
jio ३४९ चा प्लॅन –
jio च्या ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 3 GB data दिला जातो, यामध्ये ५६ दिवसाची वैधता आहे. तसेच युजर्सला Unlimited calling सह डेली 100 SMS मिळतात. jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सला jio अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आले आहे.
Airtel ५५८ चा प्लॅन –
जे लोक डेली अधिक इंटरनेटचा वापर करतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन अधिक चांगला आहे. Airtel च्या ५५८ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह डेली3 GB data मिळत आहे. यामध्ये वैधता ५६ दिवसांची आहे.