बहुजननामा ऑनलाइन टीम – वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. ऑनलाइन वैष्णोदेवी यात्रा नोंदणी आणि हेलिकॉप्टर सेवा बुकिंग 26 ऑगस्टपासून 5 सप्टेंबरसाठी सुरू होणार आहे. ही माहिती माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डचे सीईओ रमेश कुमार जांगिड यांनी दिली. त्यांनी सांगितले की, यात्रा आणि हेलिकॉप्टर सेवेसाठी इच्छुक भाविक या कालावधीसाठी ऑनलाइन नोंदणी आणि बुकिंग 26 ऑगस्टपासून करू शकतात.
कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिर 16 ऑगस्टपासून दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. पहिल्या आठवड्यात केवळ 2,000 भाविकांना परवानगी मिळाली होती. या भाविकामध्ये 1900 जम्मू-काश्मीर आणि 100 देशाच्या अन्य भागातील होते. आता 26 ऑगस्टपासून 5 सप्टेंबर या कालावधीसाठी ऑनलाइन नोंदणी आणि हेलिकॉप्टर सेवेचे बुकिंग सुरू करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसमुळे 18 मार्चपासून हे तीर्थस्थळ बंद करण्यात आले होते.
बोर्डाकडून भाविकांसाठी अनेक दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. प्रशासनानुसार, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना यात्रा करता येणार नाही आणि सर्व भाविकांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. यात्रा रात्री बंद करण्यात येईल आणि काही काळासाठी माता भवनमध्ये भक्तांना थांबता येणार नाही. याशिवाय, भक्तांना सकाळी आयोजित आरतीमध्ये सहभागी होता येणार नाही.
प्रशासनाने म्हटले आहे की, यात्रेकरूंची नोंदणी केवळ ऑनलाइन होणार आहे, जेणेकरून काऊंटर्सवर गर्दी होणार नाही. जम्मू-काश्मीरच्या बाहेर येणार्या भाविकांना 100% अनिवार्य कोविड -19 एंटीजन टेस्ट प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. टेस्ट रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर त्यांना यात्रा करण्याची परवानगी असेल.
तर, जम्मू-काश्मीरच्या रेडझोनमधून येणार्या भाविकांना भाविकांना सुद्धा टेस्ट करणे बंधनकारक आहे. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच ते यात्रेत सहभागी होऊ शकतात.