मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने खातेधारकांची मोठी अडचण दूर केली आहे. आता खातेधारकांना नोकरी बदलल्यानंतर एक्झिटची तारीख ऑनलाइन अपडेट करता येणार आहे. यापूर्वी अपडेट करण्याचा अधिकार कंपनीला होता. त्यामुळे कर्मचा-याला खूप त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता EPFO ने अपडेट करण्याचा अधिकार कर्मचाऱ्याला दिल्याने बऱ्याच मोठ्या त्रासातून सुटका झाली आहे.
प्रत्येक कंपनीमध्ये कर्मचार्याच्या पगारातून पीएफ (PF) कपात केला जातो. कपात केलेली ही रक्कम कर्मचार्याच्या पीएफ खात्यात जमा केली जाते. जोपर्यंत कर्मचारी एकाच कंपनीत काम करतात, तोपर्यंत काही अडचण नाही. मात्र कर्मचारी नोकरी सोडून दुसर्या कंपनीत जातो. तेंव्हा बहुतेक प्रकरणांमध्ये कर्मचारी जुन्या कंपनीची माहिती अपडेट करण्यास मदत करत नाहीत. कर्मचाऱ्यांची ही समस्या आता केंद्र सरकारने सोडविली आहे. निर्गमन तारीख अपडेट करण्याचा अधिकार आता फक्त खातेदारांना दिला आहे. याकरिता खातेधारकांना https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या पोर्टलवर यूएएन आणि पासर्वड टाकून लॉगिन करावे लागणार आहे. नोकरी सोडल्याची तारीख अपडेट न झाल्यास आपण आपल्या ईपीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही किंवा आधीच्या कंपनीकडून खाते नवीन खात्यावर हस्तांतरित करू शकत नाही.