नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरदारांसाठी मोठी खुशखबर येणार आहे. पुढील महिन्यापासून पीएफ खात्यात जास्त पैसे येऊ शकतात. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायजेशन (ईपीएफओ) कडून कर्मचार्यांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज जुलैच्या अखेरपर्यंत देण्याची घोषणा लवकरच होऊ शकते. या बाबतीत ईपीएफओला कामगार मंत्रालयाकडून मंजूरी मिळाली आहे. ही प्रक्रीया लवकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
6 कोटीपेक्षा जास्त कर्मचार्यांना मिळेल फायदा
कामगार मंत्रालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर पीएफच्या कक्षेत येणार्या देशभरातील सुमारे 6 कोटी कर्मचार्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी असू शकते. ईपीएफओकडून फिस्कल ईयर 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज जुलैच्या अखेरपर्यंत दिले जाऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, व्याजाचे पैसे कर्मचार्यांच्या खात्यात थेट क्रेडिट केले जाऊ शकतात.
DIG मनु महाराज यांचे ‘फेक’ फेसबूक प्रोफाइल बनवून मुलींशी अश्लील चॅटिंग, झाली अटक
‘या’ स्थितीत असतो हार्ट अटॅकचा धोका, ‘या’ पद्धतीने कराव बचाव; जाणून घ्या
आज मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन, 5 राशींना अडचणी, रहा सावध; इतरांसाठी असा आहे बुधवार