छपरा : वृत्तसंस्था – बिहारमध्ये सारण रेंजचे डीआयजी मनु महाराज यांना सायबर क्राइमचा फटका बसला आहे. छपराच्या एका तरूणाने त्यांच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर लोकांना फसवल्याचे एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. मात्र, वेळीच पोलिसांनी मनु कुमार नावाच्या या आरोपीला अटक केली. गडखा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहाडपुर गावात राहणारा मनु कुमार सोशल मीडियावर डीआईजी मनु महाराज यांच्या नावाचा वापर करून लोकांना प्रभावित करण्याचे कृत्य करत होता.
आरोप आहे की, मनु कुमारने फेसबुकवर बनावट प्रोफाइल बनवले आणि स्वता मनु महाराज असल्याचे भासवत अनेक तरूणींशी मैत्री केली आणि त्यांना अश्लील मेसेज पाठवू लागला. फेसबुकवर मनु महाराज यांचे प्रोफाइल पाहून वेगाने त्याचे फॉलोअर वाढू लागले. आरोपी या पॉपुलॅरिटीचा फायदा घेत अनेक मुलींना नोकरी देण्याचे आश्वासन देऊ लागला. त्यापैकी अनेकींकडून त्याने पैशांची सुद्धा मागणी केली. परंतु काही मुलींना यावर संशय आला तेव्हा त्यांनी ही माहिती डीआयजी मनु महाराज यांना दिली. ज्यानंतर डीआयजीच्या आदेशावर आयटी सेलने त्याचा शोध घेतला आणि गरखा येथून आरोपी मनु कुमारला अटक केली. चौकशीत आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला.
‘या’ स्थितीत असतो हार्ट अटॅकचा धोका, ‘या’ पद्धतीने कराव बचाव; जाणून घ्या
आज मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन, 5 राशींना अडचणी, रहा सावध; इतरांसाठी असा आहे बुधवार