सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – सरकारी नोकरी करू इच्छुणाऱ्यांसाठी सरकारने ठोस पाऊले उचललेली असून विविध विभागात रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. शिक्षण, आरोग्य, पोलीस, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, नगरपालिका, महसूलसह अन्य विभागात रिक्त असलेल्या ७२ हजार पदांची भरती डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. मंत्रालयातील महापरीक्षा सेलचे कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्या पुढाकाराने त्यासंबंधी नियोजन करण्यात आले असून येत्या सहा महिन्यात हि भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मिळावी आहे.
महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्याने या भारतीप्रक्रियेस वेग येणार असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डमधील रिक्त असलेल्या पदांच्या भरतीसाठी डिसेंबर अखेर अर्ज मागविण्यात येत आहे. डिसेंबर २०१९ पासून राज्यातील विविध विभागांमधील तब्बल ७२ हजार रिक्त पदे भरली जाणार असून त्याबाबतची माहिती शासकीय कार्यालयाकडून मागविण्यात आली होती. पशुसंवर्धन विभागातील परिचर व पर्यवेक्षक आणि डॉक्टरसह इतर रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या संबंधित १५ डिसेंबर नंतर वेळापत्रक देखील जाहीर होणार आहे. डिसेंबर अखेरीस पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद व आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे, दरम्यान या पदांची भरती एकाच वेळी होणार असल्याचेही बोलले जात आहे.
या संदर्भात काही ठळक बाबी –
– पशुसंवर्धन व महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डमधील रिक्त पदांच्या भरतीपासून होणार मेगाभरतीला सुरुवात
– जिल्हा परिषद, आरोग्य आणि पोलीस विभागात १५ डिसेंबर नंतर रिक्त पदांच्या भरतीचे नियोजन
– महापरीक्षा सेलच्या नियोजनानुसार २७ हजार रिक्त पदांची भरतीप्रक्रिया जून २०२० पर्यंत होणार पूर्ण
– बहुतांश विभागातील रिक्त पदांची भरती होणार एकाचवेळी; सर्वांना संधी मिळणार
– पशुसंवर्धन विभागात आठ हजार रिक्त पदांसाठी दीड लाखांहून अधिक अर्ज
महापरीक्षा सेलने मागितली रिक्त पदांची माहिती :
महापरीक्षा सेलकडून राज्य शासनाच्या विविध विभागात असलेल्या रिक्त पदांची माहिती मागविण्यात आली आहे. महापरिक्षा सेलच्या माध्यमातून मेगाभरती प्रक्रिया सुरु आहे. पुढील महिन्यापासून परीक्षा सुरु होतील असे नियोजन देखील महापरीक्षा सेलने केली आहे.
– सीताराम कुंटे, अव्वर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन, मुंबई
Visit : bahujannama.com