बहुजननामा ऑनलाइन टीम – दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज (बुधवार) बाजार खुलताच सोन्याच्या दरामध्ये तेजी पहायला मिळाली. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर जवळपास सोने 204 रुपयांच्या तेजीसह 47955 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवसाय करत होते. तर दुसरीकडे चांदी 790 रुपयांच्या तेजीसह 68300 रुपये प्रति किलोवर व्यवसाय करत होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये सोने-चांदीवरील इम्पोर्ट ड्युटी कमी करण्यासाठी प्रस्ताव आणणार असल्याचे जाहिर केल्यानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती.
दिल्लीतील सोन्याचे भाव
जागतिक स्तरावर सोन्याच्या दरात घसरण होत असताना मंगळवारी (दि.2) दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 480 रुपयांनी घसरले. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 47702 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले होते. एचडीएफसी सिक्योरिटीजने ही माहिती दिली होती. मंगळवारी चांदी 3 हजार 097 रुपयांनी घसरून 70 हजार 122 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली होती. त्यानंतर बुधवारी सोने-चांदीच्या दरात किंचित वाढ झाल्याचे पहायला मिळाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे सोन्याचे भाव 0.4 टक्क्यांनी वाढून 1844.84 डॉलर प्रति औंस झाले आहेत. याआधीच्या सत्रात 8 टक्के घसरण झाली होती. चांदीचे वायदे किंमत 27.25 डॉलर प्रति औंस झाली आहे. चांदीच्या या किमतीत 3.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेत अद्यापही कोरोनाची परिस्थिती सुधारलेली नाही. शिवाय बायडेन यांनी यासाठी पॅकेज अद्याप जाहीर केलं नाही. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये घसरण होत आहे.