मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) बदल होत आहे. गेले काही दिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून आली. मात्र आज सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली असल्याचं पाहायला मिळालं. तर चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,750 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 72,100 रुपये पर्यंत पोहचली आहे.
आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) सतत बदलत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून आली. पुन्हा त्यामध्ये घसरण झाली आहे. आता सोन्याच्या दरात किरकोळ घसरण तर चांदीचे दर वधारले असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, साधारण सोनं 50 हजाराच्या आत आहे.
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,160 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,160 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,090 रुपये
आजचा चांदीचा दर – 72,100 रुपये (प्रति किलो)
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 30 march 2022 sonyache aaje bhav
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Benefits Of Nuts | ‘या’ कारणांसाठी आहारात सुकामेव्याचा समावेश अवश्य करावा; जाणून घ्या
PUC Certificate | पीयूसी चाचणीकडे दुर्लक्ष केल्यास होईल 2 हजारांचा दंड; जाणून घ्या नियम