मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वाढ होत असल्याचं पाहायला मिळते. दरम्यान सध्या सोन्या चांदीचे दर स्थिर झाले आहेत. त्यामुळे अखेर दरवाढीला ब्रेक लागल्याचं पाहायला मिळते. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 48,200 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 68,900 रुपये पर्यंत पोहचली आहे.
आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती वारंवार बदलत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ दिसून आली. सध्या किंमती स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. जवळपास सोनं 50 हजाराच्या आत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध आहे. तसेच ग्राहकाची सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी गर्दीही दिसून येत आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,590 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,640 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,590 रुपये
आजचा चांदीचा दर – 68,900 रुपये (प्रति किलो)
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 28 march 2022 know in details
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Hadapsar Fire | हडपसर येथील गाडीतळावरील 6 दुकाने आगीत भस्मसात (VIDEO)
Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा अनोखा उपक्रम ! जिल्ह्यात पोलीसांकडून 30 ठिकाणी पाणपोईंची सोय
Diabetes Control Tips | शुगर कंट्रोल करण्यासाठी ‘हे’ 5 नियम आहेत आवश्यक, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला