मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस झाले सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. मात्र, आज सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली असून चांदीचा भाव स्थिर असल्याचे दिसत आहे. आज (बुधवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) प्रति तोळा 49,850 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 70,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात चढउतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,460 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,460 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,380 रुपये
आजचा चांदीचा दर – 70,000 रुपये (प्रति किलो)
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 20 april 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Dhananjay Munde | ‘राज ठाकरे बोलक्या भावल्यांच्या कार्यक्रमातील अर्धवटराव’; धनंजय मुंडेंची जहरी टीका
Sleep Quality | बिछान्यावर पडताच सेकंदात येईल गाढ झोप, अवलंबा ‘या’ 7 नॅचरल टिप्स; जाणून घ्या
Pune Crime | बनावट ई मेलआयडीद्वारे ईपीपीएस इन्फोटेक कंपनीची बदनामी करुन दीड कोटींचे नुकसान