नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंगळवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असून १५० रुपये इतकी वाढ सोन्याच्या दरात झाली आहे. दिल्लीत आज दुपारी प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४२,२७० रु. आहे. आज दुपारी अहमदाबाद मध्ये सोन्याचे भाव ४२,३५० रु. १० ग्रॅम, चेन्नईमध्ये ४२,४०० रु. १० ग्रॅम, मुंबईमध्ये ४२,२४५ रु. १० ग्रॅम आणि जयपूरमध्ये ४२,२३५ रु. १० ग्रॅम असे दर होते.
चांदीचेही दर मंगळवारी वाढले असून केडियाच्या अडवायजरीनुसार मंगळवारी दुपारी दिल्लीत चांदीचे भाव २२० रुपयांनी वाढले असून चांदी प्रति किलोग्राम ४७,८२० रु. झाली आहे. तर जयपूरमध्ये चांदीचे दर ४७,८१० रु., मुंबईत ४७,८३० रु., कोलकातामध्ये ४७,८९० रु. आणि अहमदाबादमध्ये ४७,८२५ रु. असे दर होते.
बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती वाढत असून मंगळवारी दुपारी ३ एप्रिल २०२० रोजी एमसीएक्स एक्सचेंजमधील सोन्याचे दर २६७ रुपयांनी वाढून ४१,०२३ रुपये प्रति १० ग्रॅम होते. ५ जून २०२० रोजी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४१,१९९ रुपयांवर होता आणि ५ ऑगस्ट २०२० रोजी सोन्याच्या दहा ग्रॅम ४१,०९४ रुपयांवर ट्रेंड करत होता. एमसीएक्स एक्सचेंजमध्ये ५ मार्च २०२० रोजी चांदीचा भाव मंगळवारी दुपारी ३३४४ रुपयांनी वाढून ४६,४६७ रुपये प्रतिकिलो होता. या व्यतिरिक्त ५ मे २०२० ला ४६,९८३ रुपये प्रति किलो आणि ३ जुलै २०२० ला प्रति किलो ४७,१४३ रुपये ट्रेंड करत होता.