नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक मार्केटमध्ये सोने आणि चांदीचे दर सतत चढउतार होताना दिसत आहे. तर आज सोन्याचांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळते. ग्राहकाला आता सोनं घेण्यास खास संधी आहे. कारण सोन्याच्या किमती कमी झाल्या आहे. तर ०.१४ इतक्या टाक्यांनी घेत होऊन सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,३५५ रुपये आहे. आणि चांदीचा दर प्रति किलो ६५,०७० रुपये इतका आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये भारतात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५६,२०० रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. ऑगस्टपासून सोन्याच्या दरात सुमारे ११००० रुपयांची घसरण झाली आहे. त्याचबरोबर वर्षाच्या पहिल्या ३ महिन्यांत सोनं प्रत्येकी १० ग्रॅम ५००० नी स्वस्त झालं आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या घसरणीसह व्यवसाय सुरू आहे. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार प्रति औंस ४.०४ डॉलरने घसरून १,७२४,९५ डॉलरवर आला आहे. तसेच, चांदी ०.०९ डॉलर एवढी घट होऊन २४.८९ डॉलरवर आली आहे.
सोन्याचा भाव –
दिल्ली :
२४ कॅरेट – ४८४६० रुपये
चेन्नई :
२४ कॅरेट – ४६६८० रुपये
मुंबई :
२४ कॅरेट – ४४९२० रुपये
कोलकत्ता :
२४ कॅरेट : ४७४८० रुपये
वर्षाअखेर पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता –
पुन्हा सोन्याचा दर गुंतवणूकदारांना चांगले उत्पन्न देऊ शकतात. मागील वर्षीही सोन्याच्या किमतीनं उच्च विक्रम नोंदविला आहे. मात्र या क्षणी सोने ऑगस्टपासूनच्या विक्रमी उच्चांकडून सुमारे ११००० रुपयांघट झालीय. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं. असे ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या संशोधन अहवालानुसार माहिती समोर आली आहे. तर २०२१ च्या अखेरीस सोन्यामध्ये पुन्हा वाढ दिसून येईल. दीर्घ कालावधीत सोने नेहमीच चांगले उत्पन्न देते. ५ मार्च रोजी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४३,८८७ रुपये होते. त्यानंतर सोन्याचा दर जवळपास ९५० रुपयांनी महाग झाली. विवाह हंगाम जसा जवळ येईल तसा मागणी वाढणार आहे , त्यामुळे ४८००० पर्यंत जाण्याची शक्यता दर्शवली आहे असे तज्ज्ञाकडून सांगितले आहे.