मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण पहायला मिळत आहे. आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी असून आज सोने उच्चांकी दरापेक्षा स्वस्त आहे. सोन्याच्या दरातील (Gold Price Today) चढउतार दरम्यान आज सोनं 231 रुपयांनी स्वस्त झालं आहे. परंतु चांदीच्या दरात वाढ (Silver Rate Hike) पहायला मिळत आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (Indian Bullion Jewelers Association) वेबसाईटनुसार, आज सोन्याचा दर 51 हजार 437 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर 51 हजार 668 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. आज सोन्याचा दर 231 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
चांदीच्या दरात तेजी कायम
आज चांदीचा दर 57 हजार 622 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 58 हजार 379 रुपये प्रति किलो दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 757 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर
सोन्या-चांदीचा दर (Gold Price Today) घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.
सोन्याची शुद्धता कशी ओळखावी
24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.
जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : – Gold Price Today | gold price drop silver price rise today 2 august check details
हे देखील वाचा :
Men Health Tips | केस गळती रोखण्यासाठी पुरुषांनी करावे हे 3 सोपे उपाय, वय होऊनही पडणार नाही टक्कल
Pune Pimpri Crime | ऑनलाईन केक मागवणं महिलेला पडलं महागात, ऑनलाईन पेमेंटद्वारे 1.67 लाखाची फसवणूक