नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण १ जानेवारीपासून सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नियमात बदल होणार आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सोने-चांदीच्या दागिन्यांची हॉलमार्किंग अनिवार्य करण्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली असून १ जानेवारीपासून हॉलमार्किंग लागू होईल. दरम्यान, दुर्गम भागात अनिवार्य हॉलमार्किंग लागू करण्यासाठी १ वर्षाची मुदत दिली जाईल. सरकारच्या या निर्णयाचा सोने उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे. याचा ग्राहकांना फायदा होईल. सध्या केवळ ४० टक्के दागिने हॉलमार्क आहेत. भारत सोन्याची आयात करणार सर्वात मोठा देश आहे, जो प्रामुख्याने सोने उद्योगाच्या मागणीची पूर्तता करते. भारत दरवर्षी ७००-८०० टन सोन्याची आयात करतो.
अनिवार्य हॉलमार्किंग मंजूर
सरकार १४ कॅरेट, १६ कॅरेट, १८ कॅरेट, २० कॅरेट आणि २२ कॅरेटचे दागिने हॉलमार्किंग अनिवार्य करेल. यासाठी ४०० ते ५०० नवीन असेसिंग सेंटर उघडली जातील. सध्या देशात ७०० हून अधिक असेसिंग सेंटर आहेत. दरम्यान अद्याप अधिक असेसिंग सेंटरची आवश्यकता असल्याचे सरकारचे म्हणणें आहे. हॉलमार्किंग अनिवार्य असण्याचा नियम ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी १ वर्षाचा कालावधी असेल. यावेळी सरकार ज्वेलर्सवर कोणतीही कारवाई करणार नाही. सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंग पूर्णपणे अनिवार्य करण्यात आली आहे. यावेळी, BIS ग्राहकांना हॉलमार्किंग ज्वेलरी घेण्यासाठी जागरूक करेल.
हॉलमार्किंग म्हणजे काय
दागिन्यांमध्ये किती सोने आहे आणि इतर धातू किती आहेत याचा हॉलमार्किंग अचूक निर्धार आणि अधिकृत नोंद देतो. नव्या नियमांनुसार आता सोन्याचे दागिने हॉलमार्किंग करणे अनिवार्य असेल. यासाठी ज्वेलर्सला परवाना घ्यावा लागेल.
Visit : bahujannama.com