नवी दिल्ली : वृत्तसंस्था – परदेशात सोने -चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर दहा ग्रॅम ७०० रुपयांनी घसरून ३९,२७० रुपयांवर गेले तर शनिवार व रविवारच्या शेवटी चांदी २,४५० रुपयांनी घसरून ४५,४५० रुपयांवर आली.
बाजारपेठेतील वैवाहिक कारणासाठी सोन्याची मागणी कायम आहे, परंतु जागतिक घसरणीने यावर वर्चस्व गाजवले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. वैवाहिक मागणीमुळे स्थानिक बाजारपेठेतील किंमती परदेशी किमतीपेक्षा कमी झाली आहे. तसेच अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धामध्ये सामंजस्याच्या अपेक्षेने पिवळ्या धातूवर दबाव असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.
लंडन आणि न्यूयॉर्कमधून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात सोने औंस ५४.८५ म्हणजेच ३.६२ टक्क्यांनी घसरून १,४५९,०५ डॉलर प्रति औंस राहिले. डिसेंबरमधील सोन्याचे वायदेही ५१.६० डॉलर म्हणजेच ३.४१ टक्क्यांनी घसरून १,४५९. ८० डॉलर प्रति औंस झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमतीतही १.३० डॉलर म्हणजेच ७.२० टक्क्यांनी घसरून १६.७६ डॉलर प्रति औंस झाले.
Visit : bahujannama.com