नवी दिल्ली : वृत्तसंस्था- सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्या चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मंदीमुळे सोन्या-चांदीच्या किंमतींवर परिणाम झाला असल्याचे म्हंटले जात आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती प्रति १० ग्रॅम १८० रुपये आणि चांदीच्या किंमती १८०० रुपयांनी घसरल्या.
दरम्यान, सोमवारी सोन्याची किंमत ३८,९२० रुपये होती तर शनिवारी बाजार बंद होताना सोन्याची किंमत दहा ग्रॅम ३८,७४० रुपयांवर पोचली. सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावावरही परिणाम झाला आहे. सोमवारी चांदीची किंमत ४६,५७५ रुपये होती, शनिवारी बाजार बंद होईपर्यंत ४४८७५ रुपयांवर पोहोचली . त्याच वेळी, जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीने १४५९.०० डॉलर्स आणि चांदीच्या १६.७६ सेंट प्रति औंस विक्रीची विक्री केली.
बाजार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धातील नरमाईमुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला. त्याचबरोबर मागणी कमी झाल्याने सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला. स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे दर नरम झाल्यामुळे सोनं स्वस्त झाले.
Visit : bahujannama.com