पुणे : बहुजननामा ऑनलाइन – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल गणेश जगताप (Ganesh Jagtap) यांना हुतात्मा अपंग बहुद्देशिय विकास संस्था (Hutatma Apang Bahu-Uddeshiya Vikas Kalyankari Sanstha) ओगलेवाडी कराड यांच्यावतीने ‘स्व. हेमंत करकरे राष्ट्रीय गौरव’ पुरस्कार (Late. Hemant Karkare National Pride Award) जाहीर झाला आहे. गणेश जगताप (Ganesh Jagtap) यांना संस्थेकडून देण्यात येणारा ‘स्व. हेमंत करकरे राष्ट्रीय गौरव’ पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील बांबरडे येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
संस्थेच्या वतीने मामाचो गाव हिरकोण येथे ‘राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार 2021’ चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक (Shripad Yesso Naik), खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut), आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी (Collector k Manjulekshmi), अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (Additional SP Nitin Bagate) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गणेश जगताप (Ganesh Jagtap) यांना यापूर्वी पोलीस दलातील (Police Force) उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक (Director General of Police Medal) पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यासह पुणे भुषण पुरस्कार, पुणेरत्न वर्दितील माणुसकी पुरस्कार, राज्यस्तरीय हुतात्मा गौरव पुरस्कार, सामाजिक सुरक्षा गौरव पुरस्कार, लोकमंगल गौरव पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, पोलीस मित्र संघटना राज्यस्तरीय पुरस्कार, आदर्श सेवा पुरस्कार, पुणे भुषण प्रेरणा, कला उपासक, अक्कलकोट भुषण पुरस्कार या सारखे अनेक समाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार मिळाले आहेत.
Web Title :- Ganesh Jagtap | Hemant Karkare National Pride Award announced to Ganesh Jagtap of Pune Police
Income Tax Exemption | हेल्थ इन्श्युरन्सद्वारे ‘या’ 6 पद्धतींनी मिळवा इन्कम टॅक्सवर सूट