बहुजननामा ऑनलाइन टीम – वाघोलीचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर विकासासाठी लागणाऱ्या निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी वाघोली (Ashok Pawar)येथे केले.
पुणे महापालिकेच्या हद्दीलगतची २३ गावे लवकरच महापालिकेत समाविष्ट होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वाघोली येथे आमदार अशोक पवार यांच्या संपर्क कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी वाघोलीच्या सरपंच वसुधंरा उबाळे ,माजी जि.प सदस्य रामभाऊ दाभाडे,जेष्ठ नागरिक किसनमहाराज जाधव ,बाळासाहेब शिंदे याच्या,सह आजी, माजी पदाधिकारी व वाघोली हौसिंग सोसायटी चे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले कि, वाघोलीचा महापालिकेत समावेश करण्यासंदर्भात खुद्द पालकमंत्री अजित पवार आग्रही आहेत. वाघोलीचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर निधीची कमतरता भासेल अशी चिंता ग्रामस्थ व्यक्त करीत असले तरी सध्या असलेल्या लोकसंख्येला सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायतीला अडचणी येत आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवार सकारात्मक असल्याने निधीची कमतरता भासणार नाही. महानगरपालिकेशिवाय वाघोलीचा विकास शक्य होणार नाही. कचरा, पाणी, वाहतूक कोंडी, ड्रेनेज, रस्ते आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
यावेळी उपस्थितीत वाघोलीतील पदाधिकाऱ्यांनी महापालिका समावेशाबाबत सामार्थानाच्या भूमिका मांडल्या.
तर यावेळी बोलताना काहीनी पुर्वी समावेश झालेल्या ११ गावाचा विकास झालेला नाही अशा ग्रामस्थाचा संभ्रम आहे हा दुर करावा अशी देखील मागणी यावेळी केली .