नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेहमी लोक आपल्या गाडीच्या कमी मायलेजमुळे त्रस्त असतात. नवी गाडी खरेदी करणे तर सोपे आहे, परंतु ती व्यवस्थीत चालवणे आणि ठेवणे लोकांना अजूनही समजलेले नाही, ज्यामुळे नेहमी ब्रेकडाऊनसह गाडीतील इंधनाचा वापर वाढू लागतो. या रिपोर्टमध्ये आम्ही अशा महत्वाची गोष्टी सांगणार आहोत, ज्या जाणून घेतल्यानंतर तुमची गाडी फिट राहील आणि सोबतच चांगले मायलेज सुद्धा देईल.
हे लक्षात ठेवा
1 वेळेवर करा सर्व्हिस
नेहमी आढळून येते की, लोक आपल्या कारची वेळेवर सर्व्हिसींग करत नाहीत. याचा परिणाम इंजिनवर होतो, आणि मायलेज कमी होऊ लागतो. तसेच स्वस्त सर्व्हिसींग, स्वस्त पार्ट आणि स्वस्त लुब्रिकंटचा वापर काहीजण करतात, जे खुप घातक ठरू शकते. यासाठी योग्य ठिकाणी सर्व्हिसींग करा आणि एकही सर्व्हिसींग मीस करू नका.
2 सतत क्लचचा वापर करणे
गाडी चालवताना सतत क्लचा वापर केल्याने इंधनाचा वापर वाढतो. सोबतच क्लच प्लेटचे नुकसान होते. यासाठी योग्यवेळीच क्लचा वापर करा. ड्राइव्हदरम्यान एक्सिलरेटर पॅडलला सावकाश दाबा, असे केल्याने इंधनाचा वापर कमी होईल.
3 लोअर गियरमध्ये असे करणे नुकसानकारक
गाडी चालवताना लोअर गियरमध्ये येताना एक्सिलरेटर अजिबात दाबू नका, कारण असे केल्याने फ्यूलचा वापर वाढतो आणि मायलेज घसरू लागतो. तुम्हालाही कारच्या मायलेजमध्ये वाढ हवी असेल तर या गोष्टींकडे लक्ष द्या.
4 एयर प्रेशर योग्य नसणे
गाडीच्या टायर्समध्ये रेग्युलर एयर प्रेशर योग्य न ठेवल्यास मायलेज कमी होते. हे एक मोठे कारण आहे. आठवड्यातून दोन वेळा टायर प्रेशर चेक करा. यामुळे गाडी चांगले मायलेज देते.
5 एक्स्ट्रा सामान ठेवू नका
काही लोक गाडीत विनाकारण सामान ठेवतात, ज्यामुळे गाडीचे वजन वाढते. गाडीच्या इंजिनला जास्त ताकद लावावी लागते, ज्यामुळे जास्त इंधन खर्च होते. यामुळे कारमध्ये उगाचच सामान ठेवू नका.