मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईतील नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या करण्यापुर्वी विद्यार्थी डॉक्टरांनी टोल फ्री क्रमांकावरून रॅगिंगच्या ४ तक्रारी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे प्रशासनाने या चारही तक्रारी ठोस कारवाई करत निकाली काढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी रुग्णालयाकडे याबाबतची माहिती मागितली होती.
२०१३ पासून २१ रॅगिंगविरोधी समितीच्या बैठका
प्रत्येक महाविद्यालयात रॅगिंगविरोधी समिती स्थापन करण्यात आलेली असते. तशी समिती नायर रुग्णालयातही आहे. २०१३ पासून नायर रुग्णालयातील रॅगिंगविरोधी समितीच्या २१ बैठका झाल्या आहेत. अशी माहिती समोर आली आहे.
आतापर्यंत २ विद्यार्थ्यांचे निलंबन
नायर रुग्णालयातील तक्रारींवर कारवाई करत समितीने आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांचे निलंबन केले असल्याचे समितीचे म्हणणे आहे. तर एका तक्रारीवर समितीने केवळ विद्यार्थ्याशी चर्चा केल्याचे समोर आले आहे.
तर पायल तडवींचा नाहक बळी गेला नसता
नायर रुग्णालय प्रशासनाने रॅगिंगविरोधात वेळीच गांभीर्याने कारवाई केली असती तर डॉ. पायल तडवींचा नाहक बळी गेला नसता. याप्रकरणाची चौकशी गांभीर्याने व्हायला हवी होती असे मत आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी व्यक्त केली.
चक माहिती अधिकारात समोर आलेल्या तक्रारींची दखल रुग्णालय प्रशासन आणि रॅगिंगविरोधी समितीने घेतली . त्यानुसार चौकशी आणि तपास सुरु आहे. रॅगिंगविषयी तक्रारींच्या निरसनाची प्रक्रिया अजून सुरु आहे. दोषी आढळल्यास संबंधिकांना शिक्षा केली जाते असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी म्हटले आहे.