अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – रस्त्याने जात असलेल्या अल्पवयीन मुलीला अडवून तिला अल्पवयीन मुलाने थेट प्रपोज करीत ‘आय लव यु’ म्हटले. त्यावर घाबरुन ही मुलगी पुढे जाताच इतर दोन मित्राला त्याने मी ५०० रुपयांची पैज जिंकलो असे म्हणाला. मात्र, या मुलीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
ही धक्कादायक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात रात्री घडली. पोलिसांनी दोन अल्पवयीनांसह तिघांविरुद्ध ३५४, ३५४ (ड), ३४१, ३४ सह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.
ही मुलगी मैत्रिणीसोबत मंदिरातून घरी जात असताना तीन मुले रस्त्यावर उभे होते. त्यातील एक अल्पवयीन मुलाने हात आडवा करुन मुलीला अडविले. तसेच तिला ‘आय लव यु’ असे म्हटले़ त्यामुळे ही मुलगी घाबरुन पुढे निघून गेली. त्यानंतर या मुलाने मी ५०० रुपयांची पैज जिंकलो. ते पैसे दे, असे म्हणाला. ही मुले नेहमीच टवाळखोरी करुन येणार्या जाणार्या मुलींची टिंगल करीत असतात, असे मुलीने तक्रारीत म्हटले आहे.