बहुजननामा ऑनलाईन
फ्लिपकार्ट बीग सेविंग डेज सेलची सुरुवात 18 सप्टेंबर पासून होत आहे. हा सेल 20 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. या तीन दिवसांसाठीच्या सेलमध्ये ई-कॉमर्स वेबसाईटवर डिस्काउंट आणि जबरदस्त ऑफर्स दिल्या जाणार आहेत. बिग सेलमध्ये मोबाईल, टॅबलेट, टीव्ही, अॅक्सेसरी आणि अन्य दुसरे इलेक्ट्रॉनिक सामानाची खरेदी करता येऊ शकते. फ्लिपकार्ट 1 रुपयात आपली मनपसंत सामान प्री-बुक करण्याची ऑफर देत आहे. ही प्री-बुक ऑफर 15 सप्टेंबर आणि 16 सप्टेंबर या दोन दिवसांसाठी असणार आहे. एसबीआय कार्ड युजर्संना ईएमआय आणि कार्ड द्वारे ट्रान्झॅक्शनवर सूट मिळणार आहे.
फ्लिपकार्टने आपल्या बिग सेविंग डेज सेलमध्ये कोणकोणत्या वस्तू उपलब्ध होणार आहेत याचा खुलासा अद्याप केलेला नाही. मात्र, मोबाइल आणि टॅबलेट्सची माहिती दिली आहे. नो कॉस्ट ईएमआय, कार्डलेस, क्रेडिट आणि एक्सचेंज ऑफर सोबत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. टीव्ही आणि अप्लायन्स खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांसाठी कंपनी नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स सोबत कंपलीट अप्लायन्स प्रोटेक्शन ऑफर करत आहे.
या सेलमध्ये तब्बल 3 कोटी हून अधीक इलेक्ट्रॉनिक आणि अॅक्सेसरीज व्रिकीसाठी उपलब्ध असणार आहेत. यावर नो कॉस्ट ईएमाय आणि एक्सचेंज ऑफर्स मिळणार आहेत. अॅक्सेसरीजमध्ये फ्लिपकार्ट्स स्मार्टबॉय प्रोडक्ट्स यासारखे वायरलेस माऊस, की बोर्ड्स, पॉवर बॉक्स, हेडफोन, केबल यांवर आकर्षक सूट मिळणार आहे. याशिवाय SBI कार्ड युजर्संना क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर 10 टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे.
त्यासोबतच फ्लिपकार्ट एक रुपयात प्रोडक्टला प्री बुक करण्यासोत गारंटिड स्टॉक मिळण्याची ऑफर देत आहे. प्री बुक करण्यासाठी ग्राहकांना फ्लिपकार्टच्या होमपेजवर प्री बुक स्टोर वर जाऊन आपली ऑर्डर बुक करण्यासाठी एक रुपया द्यावा लागेल. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी बाकीची रक्कम देऊन प्रोडक्ट खरेदी करता येईल.