बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्रातील मोदी सरकारने तोट्यात चालत असलेल्या अनेक सरकारी कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील काही कंपन्या (Modi government in 2020)या त्या त्या क्षेत्रातील नामांकित होत्या. पण, काही वर्षांपासून त्यांच्यावर टाळे लटकले आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार निर्गुंतवणुकीसाठी प्रयत्नशील आहे. त्यामाध्यमातून चालू आर्थिक वर्षात २.१० लाख कोटी उभा करण्याचे लक्ष सरकारने ठेवले आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या कंपन्या सरकारने बंद केल्या आहेत.
>> हिंदुस्थान फ्लुरोकार्बन लिमिटेड
हिंदुस्थान फ्लुरोकार्बन लिमिटेड रसायन आणि पेट्रो रसायन विभागातील ही कंपनी नुकसानीत चालत असल्याने बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई देण्यात येणार असून, त्यासाठी सरकार कंपनीला ७७.२० कोटी बिनव्याजी देणार आहे. तसेच याची भरपाई कंपनीची जमीन आणि संपत्तीची विक्री करुन केली जाईल.
>> स्कूटर्स इंडिया
लॅम्ब्रेटा, विजय डिलक्स आणि विजय सुपर अशा स्कुटर भारतीयांना देणारी स्कुटर इंडिया लिमिटेड कंपनी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. १९८० मध्ये स्कुटर इंडियाने बाजारात शेवटची स्कुटर लाँच केली होती. सध्या या कंपनीचे सर्व प्लांट बंद आहेत.
>> भारत पम्प अँड कॉम्प्रेसर्स लिमिटेड
भारत सरकारच्या लघुरत्न कंपन्यांपैकी भारत पम्प अँड कॉम्प्रेसर्स लिमिटेड एक आहे ही कंपनी रेसिप्रोकेटिंग पम्प, सेन्ट्रिफ्युगल पम्प, रेसिप्रेकेटिंग कॉम्प्रेसर आणि उच्च दाब असलेले सीवनहीन गॅस सिलेंडर तयार करते. या कंपनीचे मुख्यालय अलाहाबाद मध्ये आहे.
>> हिंदुस्थान प्रीफॅब
भारताच्या सर्वात जुन्या सीपीएसईमधील असलेल्या हिंदुस्थान प्रीफॅब’ला १९४८ मध्ये एका विभागाच्या रुपात स्थापन केले होते. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीवेळी पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या लोकांच्या राहण्याच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी याची स्थापन केली गेली.
>> हिंदुस्थान न्यूजप्रिंट लिमिटेड
हिंदुस्थान न्यूजप्रिंटला केरळमधील वेल्लूरमध्ये ७ जून १९८३ रोजी हिंदुस्थान पेपर कॉर्पोरेशन लिमिटेडला पूर्ण स्वामित्वाधीन सहाय्यक कंपनीच्या रूपात स्थापन केले होते. १९९८ साली HNL ने आकर्षक ISO प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली न्यूजप्रिंट निर्माता कंपनी बनण्याचा मान मिळवला होता. सध्या कंपनी बंद आहे.
>> कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (KAPL)
१९८४ साली एका सामान्य सुरुवातीनंतर KAPL ने विविध जीवन रक्षक, आवश्यक औषधांची निर्मिती आणि विपणनाच्या क्षेत्रात भक्कमपणे पाऊल ठेवले. ISO मान्यतेसोबत KAPL ला घरगुती आणि आंतराष्ट्रीय बाजारात गुणवत्ता आणि सेवेसाठी ओळखले जाऊ लागले.