नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fixed Deposit | जर तुम्ही सुद्धा बँक एफडी (Bank FDs) करण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. डीसीबी बँक (DCB bank Fd Rates) आपल्या ग्राहकांना 3 वर्षासाठी फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) वर 7 टक्केपेक्षा जास्त व्याज देत आहे. तुम्हाला सुद्धा या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर एफडी करू शकता.
एफडीवर जास्त व्याजाचा लाभ तुम्ही 16 ऑगस्टपर्यंत घेऊ शकता. यानंतर एफडी करणार्यांना सामान्य दराने व्याज मिळेल. ही विशेष ऑफर केवळ सोमवारपर्यंतच आहे. यासाठी बँकेत जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकता.
किती मिळेल व्याज?
सध्या देशातील अनेक बँका 6.25 टक्के पर्यंत व्याज देत आहेत. अशावेळी डीसीबी बँकेची ही ऑफर ग्राहकांसाठी खुप लाभदायक आहे. 3 वर्षाच्या एफडीवर 7.11 टक्केच्या दराने व्याज मिळेल.
ऑनलाइन करू शकता एफडी
विशेष म्हणजे ही एफडी तुम्ही ऑनलाइन सुद्धा करू शकतात. यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. तसेच बँकेत बचत खाते नसेल तरी लाभ घेऊ शकता.
मे मध्ये व्याजदरात झाली दुरूस्ती
डीसीबी बँकेने मे महिन्यात व्याजदरात बदल केले होते. ज्यानंतर बँकेने व्याजदर 4.55 टक्केपासून 5.70 टक्केपर्यंत केले. प्रायव्हेट बँक 7 दिवसापासून 14 दिवसादरम्यानच्या मॅच्युरिटीसह FD वर 4.55 टक्के व्याज ऑफर करत आहे. 91 दिवसापासून 6 महिन्यादरम्यान एफडीवर 5.25 टक्के तर बँक 6 महिन्यांपासून 12 महिन्यापेक्षा कमी मॅच्युरिटीच्या एफडीवर 5.70 टक्के व्याज देत आहे.
किती आहेत बँकेचे ग्राहक?
सध्या बँकेच्या 354 ब्रँच आहेत. ही प्रायव्हेट सेक्टरमधील बँक आहे. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे रेग्युलेटेड शेड्यूल्ड कमर्शियल बँक आहे. डीसीबी बँकेचे 10,00,000 पेक्षा जास्त अॅक्टिव्ह ग्राहक आहेत.
Web Title :- Fixed Deposit | dcb bank offereing more than 7 percent-interest in fixed deposit check all details
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Police | पुणे शहर पोलीस दलातील तिघांना राष्ट्रपती पोलीस पदक